Rahul Gandhi speaking to the media after Parliament proceedings on the India-US trade deal. 
देश विदेश

'ते घाबरलेत! पंतप्रधान मोदींनी देश विकला'; भारत-अमेरिका व्यापार करारावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi on India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करारावर राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी या व्यापार करारात तुमचे कष्ट विकले आहेत, ते तडजोड करणारे आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

Bharat Jadhav

  • भारत-अमेरिका व्यापार करारावर राहुल गांधींचा तीव्र विरोध

  • पंतप्रधान मोदींनी देश विकल्याचा गंभीर आरोप

  • ट्रम्प यांच्या कर कपातीच्या घोषणेनंतर राजकीय वाद

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत मोठी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांनी भारतावरील कर १८ टक्क्यांपर्यंत कमी केले. त्यावरून काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिलीय. राहुल गांधींवर केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर सभागृहातून बाहेर पडताना राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. नरेंद्र मोदी यांनी या व्यापार करारात तुमचे कष्ट विकले. कारण मोदी तडजोड करणारे आहेत. त्यांनी देश विकला आहे, अशी टीका राहुल गांधी केलीय. संसदेत माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, मोदी घाबरले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका-भारत व्यापार करार रखडला होता.

नरेंद्र मोदी यांनी काल रात्री त्या करारावर स्वाक्षरी केली. मोदींवर खूप मोठा दबाव आहे. नरेंद्र मोदींची प्रतिमा डागाळू शकते. आपले पंतप्रधान तडजोड करणारे आहेत, जनतेने याचा विचार करायला हवा. पहिल्यांदाच, राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षनेत्याला बोलू देण्यात आले नाही.

नरेंद्र मोदी यांनी या व्यापार करारात तुमचे कष्ट विकले आहेत, कारण त्यांनी तडजोड केली आहे, असं राहुल गांधी म्हणालेत. नरेंद्र मोदी घाबरले आहेत कारण ज्यांनी त्यांची प्रतिमा निर्माण केली तेच आता त्यांची प्रतिमा नष्ट करत आहेत. अदानींवर अमेरिकेत एक खटला दाखल आहे. हा खटला मुळात मोदींविरुद्धचा आहे. एपस्टाईन फाइल्समध्ये असे बरेच काही आहे, जे अमेरिकेने अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळेही त्यांच्यावर दबाव आहे. हे दोन दबाव केंद्र आहेत. देशाने हे समजून घेतले पाहिजे, असंही राहुल गांधी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, घाट परिसरात 'यलो अलर्ट

EPFO Rule 2026: EPFOचा मोठा बदल! 20 अन् 25 हजार सॅलरीवर आता PF किती कापला जाणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

SCROLL FOR NEXT