rahul gandhi press saam tv
देश विदेश

राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत दाखवले मोदी-शाहांचे ते २ व्हिडिओ; निवडणुका, मतचोरी, शंका उपस्थित करत केले गंभीर आरोप

Rahul Gandhi Vote Theft Allegations Against Election Commission: राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे दोन व्हिडिओ दाखवत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.

Omkar Sonawane

नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जुने व्हिडिओ दाखवत भाजपच्या निवडणूक विजयावर सवाल उपस्थित केले. सरकारविरोधी वातावरण असल्याचे दिसत असतानाही भाजप निवडणुका कशी जिंकत आहे असा सवाल राहुल गांधी यांनी केला. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा दाखला देत त्यांनी निवडणुक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला.

राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवरही प्रश्न उपस्थित केला. ज्ञानेश कुमार यांची निवड खुद्द पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. 2024 मध्ये देशात व्होट चोरी झाली असून मतचोरी म्हणजे केवळ मतांवर नव्हे तर प्रत्येक भारतीयावर आणि संविधानावर हल्ला असल्याचेही त्यांनी म्हटले. मतांमध्ये फेरफार करून खासदार संसदेत पोहोचल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या काही निर्णयांवर आक्षेप घेतल्याच्या वृत्ताचा संदर्भही या वादाला आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, मागील दहा महिन्यांत दोन्ही निवडणूक आयुक्तांनी काही निर्णयांवर एकूण 14 वेळा आक्षेप नोंदवले असल्याचे समोर आले आहे. मात्र, निवडणूक आयोगाने सर्व निर्णय एकमताने घेतले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toenails Turn Black: पायांची नखं अचानक काळी-पिवळी पडतायत? जाणून घ्या यामागची ३ प्रमुख कारणे

दिवसभरात किती कॉफी पिऊ शकता? जास्त कॉफी प्यायल्यानं काय होतं?

Banana Storage : बाजारातून घरी आणल्यानंतर केळी लगेच काळी पडतात? जास्त दिवस ताजी राहावीत यासाठी करा 'हे' 6 सोपे उपाय

Return Gift Ideas: गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी 7 सुंदर गिफ्ट्स

मुख्य निवडणूक आयुक्त देशाचे गद्दार; राजीनामा द्या! ज्ञानेश कुमारांना कॉक्रोच जनता पार्टीचा 48 तासांचा अल्टीमेटम

SCROLL FOR NEXT