रश्मी पुराणिक (मुंबई)
नवी दिल्ली: युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची लवकरात लवकर सुटका करावी, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारला (Modi Government) केले आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, बंकरमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे दृश्य विचलित करणारे आहे, अनेक विद्यार्थी पूर्व युक्रेनमध्ये (Ukraine) अडकले आहेत, जिथे सध्या जोरदार हल्ले होत आहेत.
राहुल गांधी म्हणाले की, मी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. ते म्हणाले की, मी भारत सरकारला आवाहन करतो की विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
युक्रेनमधून भारतीयांचे (Indians) परतणे सुरू झाले आहे. एअर इंडियाचे (Air India) विमान शनिवारी सकाळी मुंबईहून (Mumbai) रोमानियातील बुखारेस्ट शहरासाठी रवाना झाले आहे. यामध्ये 470 विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जाणार आहे. यानंतर 1 फ्लाइट हंगेरीहून दिल्लीला (Delhi) येईल. त्याचवेळी एअर इंडियाच्या 2 फ्लाइटला रोमानियाहून दिल्लीला पोहोचायचे आहे. याआधी शुक्रवारी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) सांगितले होते की युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पोलंड आणि हंगेरीमार्गे परत आणले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 20 हजार भारतीय अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत. यात तेथे शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान, वैद्यकीय विद्यार्थ्यांना बंकरमध्ये लपून राहावे लागत असल्याची काही चित्रेही समोर आली आहेत. त्यामुळे आता भारत सरकारकडून बचाव मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुतीन (Vladimir Putin) यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेदरम्यान हा मुद्दा उपस्थित केला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.