Rahul Gandhi addressing media while presenting documents related to alleged voter list irregularities. saam tv
देश विदेश

Vote Chori: व्होट चोरीसाठी झिरो नंबरचा खेळ? हाऊस नंबर झिरो, मग घरात राहतं कोण? राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट

Zero House Number Vote Chori Controversy: लोकसभेचे विरोध पक्षनेते राहल गांधींनी व्होट चोरीतला झिरो नंबरचा खेळ काय चाललाय याबाबत मोठा बॉम्ब फोडलाय. झिरो नंबरची ही नेमकी खेळी काय आहे? आणि आयोगाचे दावे कसे फोल ठरले आहेत. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Suprim Maskar

  • झिरो नंबरच्या मतदारांवरून निवडणुक आयोगाला घेरलयं.

  • मतदार यादीत एकाच घरात ६०-६० मतदार

  • व्होट चोरीतला झिरो नंबरचा खेळ काय

राहुल गांधींनी झिरो नंबरच्या मतदारांवरून निवडणुक आयोगाला घेरलयं. काही दिवसांपूर्वी मुख्य निवडणुक आयुक्तांनी झिरो नंबरच्या मतदारांबाबत एक वेगळीच थिअरी मांडली होती. बेघर असलेल्या मतदारांना झिरो नंबर दिला जातो असं ज्ञानेश कुमार यांचं म्हणणं होतं. राहुल गांधींनी झिरो नंबरच्या मतदारांवरून निवडणुक आयोगाला घेरलयं.

काही दिवसांपूर्वी मुख्य निवडणुक आयुक्तांनी झिरो नंबरच्या मतदारांबाबत एक वेगळीच थिअरी मांडली होती. बेघर असलेल्या मतदारांना झिरो नंबर दिला जातो असं ज्ञानेश कुमार यांचं म्हणणं होतं.

राहुल गांधी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत एकाच घरात ६०-६० मतदार असल्याचेही पुरावे दाखवले आहेत. एका भाजप नेत्याच्या घरातच तब्बल 66 मतदारांची नोंद असल्याचा दावा त्यांनी केलाय.

हरियाणातल्या झिरो क्रमांकाच्या मतदारांबाबत राहुल गांधींनी टाकलेल्या बॉम्बमुळे निवडणूक आयोगाच्या दाव्यांना सुरूंग लागलाय. कारण देशात तब्बल 93 हजार बेघर मतदार असल्याचा दावा केला मुख्य निवडणुक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत केला होता.

मात्र त्यातले सर्वच मतदार खरचं बेघर आहेत का? त्या मतदारांना बेघर ठरवण्याआधी आयोगानं शहानिशा केलीय का? असे अनेक प्रश्न हरियाणातल्या मतदार यादीतल्या घोळांमुळे समोर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

Lagnanantar Hoilach Prem Video : जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्याचा संसार मोडला? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मोठा ट्विस्ट

मोठी बातमी! काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये आज प्रवेश करणार

Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार

SCROLL FOR NEXT