राहुल गांधींनी राजुरा मतदारसंघात मतचोरी झाल्याचा आरोप केला.
६८५० मतं आधी वाढवली आणि नंतर डिलीट केल्याचे पुरावे त्यांनी सादर केले.
भाजपचे देवराव भोंगले यांनी काँग्रेसचे सुभाष धोटे यांचा ३०५४ मतांनी पराभव केला.
निवडणूक आयोग आणि आयुक्त ज्ञानेकुमार मतचोरीस मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा बॉम्ब फोडला. त्यांनी मतचोरीचा आरोप करत भाजप सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेकुमार यांच्यावर मत चोरीला मदत केल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी यावेळी पुरावे सादर तर केलेच त्याचसोबत मतदारांना देखील समोर आणले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजुरामध्ये मते वाढवण्यात आल्याचा आरोप केला आहे.
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील राजुराचा उल्लेख केला. त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूरमधील राजुरा मतदारसंघात मतचोरी झाल्याचा आरोप केला आहे. आधी मतं वाढवली आता डिलीट केली जात आहेत, असे ते राहुल गांधी म्हणाले. याबाबत त्यांनी पुरावे देखील दाखवले.
ते म्हणाले की, 'राजुरामध्ये मत वाढवण्यात आली. राजुरा मतदारसंघात हजारो नावे वगळली. त्यानंतर नवीन ६८५० नावं वाढली आहेत. आधी मते वाढवण्यात आली होती आणि आता डिलिट केली जात आहेत. भाजपच्या देवराव भोंगलेंकडून काँग्रेसच्या सुभाष धोटेंचा पराभव करण्यात आला. ३०५४ मतांनी पराभव करून राजुराची जागा जिंकण्यात आली.', असा आरोप करत राहुल गांधी यांनी आकडेवारीच सांगून टाकली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाचे आयुक्त मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा हल्लाबोल देखील केला.
यावेळी राहुल गांधी यांनी कर्नाटकातील मतचोरीचा देखील उल्लेख केला आहे. कर्नाटकमधील आलंग मतदारसंघात ६०१८ मते वगळण्यात आली. काँग्रेसच्या मतदारांना वगळले जात आहे. दलित, ओबीसी आणि अल्पसंख्यांक मतदारांची नावं मतदार यादीतून जाणूवपूर्वक वगळली जात आहेत.', असा गंभीर आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.