लोकसभा निवडणुकीत बहुत मिळाल्यामुळे एनडीए येत्या दोन तीन दिवसात सत्ता स्थापन करणार आहे. इंडिया आघाडीनेहूी विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीतून संसदेतील विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधी यांची निवड होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून याची लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
लोकसभा विरोधी पक्ष नेत्याला मंत्रीपदाइतकाच दर्जा असतो. तसंच विरोधी पक्ष नेता हा भावी पंतप्रधान म्हणूनही ओळखला जातो. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गेल्या दहा वर्षात काँग्रेस आणि यावर्षी स्थापन करण्यात आलेल्या इंडिया आघाडीला मोठं यश मिळालं आहे. काँग्रेसने ९९ जागांनर तर इंडिया आघाडीने २३४ जागांवर विजय मिळवला आहे. इंडिया आघाडीच्या या विजयात राहुल गांधी आणि त्यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रेचा वाटा मोठा आहे.
प्रचारसभांमध्येही राहुल गांधींनी आक्रमक प्रचार केला आहे. महागाई, बेरोजगारी, गरीब-श्रीमंत दरी, जातीय राजकारणाचे मुद्दे ठळकपणे लोकांसमोर मांडले. कल्याणकारी योजनांची घोषणा केली. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळेच इंडिया आघाडीची धुरा त्यांच्याच खांद्यावर असून विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्याची शक्यता आहे. काँग्रेस संसदीय मंडळाची येत्या एक दोन दिवसांत बैठक होणार आहे. या बैठकीत राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसला २०१४ मध्ये ४४ आणि २०१९ मध्ये ५२ जागां मिळाल्या मिळाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा संसदेत अधिकृत विरोधी पक्ष नेता नव्हता. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने ९९ जागांवर विजय मिळवला आहे. ससंदीय नियमांनुसार, लोकसभा विरोधी पक्ष नेतेपद मिळण्यासाठी निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला किमान १० टक्के जागां मिळवाव्या लागतात. म्हणजेच लोकसभेच्या एकून ५४३ जागांपैकी ५५ खासदार निवडून यावे लागतात. यंदा काँग्रेसचे ९९ खासदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदाच्या शर्यतीत राहुल गांंधी यांचं नावं केंद्रस्थानी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.