Rahul Gandhi News  Saam tv
देश विदेश

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांना मोठा झटका; सुरत सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली

Congress News : काँग्रेसने नेते राहुल गांधी यांना सेशन कोर्टाने मोठा झटका दिला आहे.

Shivaji Kale

Rahul Gandhi News : काँग्रेसने नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे कारण सूरत कोर्टने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे. मोदी आडनावावरून केलेल्या टीप्पणीप्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती.

या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी राहुल गांधी यांनी सूरत कोर्टात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणात राहुल गांधींना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला. त्यामुळे राहुल गांधींना तुर्तास खासदारकी मिळणार नाही. (Latest Marathi News)

2019 मध्ये केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सूरत न्यायालयाने 23 मार्चला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. खासदारी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या शिक्षेप्रकरणी सूरत कोर्टात आव्हान दिलं. परंतु, सुरत (Surat) कोर्टाने त्यांची याचिकाच फेटाळून लावली आहे. सुरत कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात राहुल गांधी आता हायकोर्टात दाद मागणार आहेत.

हे संपूर्ण प्रकरण आहे

23 मार्च रोजी, सुरतच्या CJM न्यायालयाने राहुल गांधी यांनी 2019 मध्ये मोदी आडनावाबाबत केलेल्या टिप्पणीप्रकरणी कलम 504 अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, न्यायालयाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती.

राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्नाटकातील कोलारमध्ये एका रॅलीत ललित मोदी, निरव मोदी, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नाव कॉमन का आहेत? सगळ्या चोराचे नाव मोदी का असतं? असं विधान केलं होतं.

त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanya Sumangala Yojana: लाडक्या लेकींना जन्मापासून मिळणार २५,००० रुपये, काय आहे सरकारची खास योजना?

Maharashtra News Live Update: कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथं जुन्या घराची भिंत कोसळली, तिघे गंभीर जखमी

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील दर किती?

Beed Crime: बीड हादरले! परळीत राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, ५ ते ६ जणांनी भररस्त्यात कोयत्याने केले सपासप वार

Deepika Padukone Latest News: सिनेसृष्टीपासून दूर राहून अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या नेमकी काय करतेय?

SCROLL FOR NEXT