Parents Demand Due to Heat Wave: सीबीएसईसह केंद्रीय बोर्डाच्या शाळा सकाळच्या सत्रात घ्या, पालकांची शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

Demand of School in Morning Session Due to Rising Temperatures: राज्यातील वाढत्या तापमानामुळे पालकवर्ग चिंतेत...
Heat Wave
Heat WaveSaam Tv

रुपाली बडवे

Maharashtra Heat Wave: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत असून वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण तर कुठे पाऊस पडत आहे.

राज्यातील वाढत्या तापमानामुळे पालकवर्ग चिंतेत आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर  पालकांनी सीबीएसईसह इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी शाळा प्रशासन आणि शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. (Latest Marathi News)

Heat Wave
Nashik It Raids : नाशिकमध्ये आयकर विभागाचे छापे, बांधकाम व्यावसायिक आयकरच्या रडारवर

खारघरमध्ये उष्माघाताने झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर नवी मुंबई (Navi Mumbai)पालक संघटना आणि त्यासोबत राज्यातील इतर पालक संघटनांनी सीबीएसई व इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवाव्यात, अशी मागणी शाळा प्रशासन आणि शालेय शिक्षण मंत्री यांना केली आहे.

ही मागणी विचारात घेता सीबीएसई (CBSC) व इतर केंद्रीय बोर्डाच्या या सकाळी अकराच्या आधी भरवल्या जाव्या, अशा प्रकारची मागणी पालक संघटनांची आहे. राज्यभरात उष्णतेची लाट (Heat Wave) आणि दुपारच्या सत्रात भरणाऱ्या शाळा पाहता पालक वर्गाने चिंता व्यक्त केली आहे.

ही मागणी विचारात घेता, काही शाळांनी शाळा स्तरावर आपल्या शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याचे ठरवलं असून सकाळी 11 च्या आधी शाळांचे वर्ग भरवले जात आहेत. सीबीएसई आणि इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या उत्तर भारतातील हवामानाचा विचार करता देशभरात मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू असतात.

Heat Wave
Nagpur News : संतापजनक ! नातेवाईकानेच केले निर्दयी कृत्य, नागपूरात चार वर्षीय मुलीवर अत्याचार

राज्यात सुद्धा सीबीएसईच्या शाळा या १० मे पर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिल्या जाणार आहेत. मात्र शाळा १० मे पर्यंत सुरू ठेवताना त्या सकाळच्या सत्रात भरवल्या जाव्या, असं पालक वर्गाने पत्र देऊन मागणी केली आहे.

सध्या राज्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. बहुतांश शहारात तापमानाचा पारा हा 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास गेला आहे. उष्णतेचा नागरिकांना त्रास होत असून, दुपारच्या वेळी रस्ते रिकामे दिसत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com