Modi Surname Defamation Case Saam tv
देश विदेश

Defamation Case: राहुल गांधींना दिलासा मिळणार? गुजरात हायकोर्ट २ मे रोजी सुनावणार फैसला

Modi Surname Defamation Case : राहुल गांधींना दिलासा मिळणार? गुजरात हायकोर्ट २ मे रोजी सुनावणार फैसला

Satish Kengar

Defamation Case: मोदी आडनाव मानहानी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत एम पृच्छक यांच्या न्यायालयात ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी राहुल गांधींच्या वतीने युक्तिवाद केला आणि शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली.

सिंघवी यांनी सुमारे अडीच तास युक्तिवाद केला. तसेच राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणाऱ्या पूर्णेश मोदी यांच्या वकिलांनी याप्रकरणी काही कागदपत्रे सोपवण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यावर नयायमूर्ती म्हणाले की, ''याप्रकरणी पुढील सुनावणी 2 मे रोजी होईल.'' (Latest Marathi News)

न्यायालयाने पूर्णेश मोदी यांच्या वकिलांना सोमवारी सायंकाळपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले. यानंतर न्यायमूर्ती हेमंत एम पृच्छक म्हणाले की, या प्रकरणाची सुनावणी 2 मे रोजी दुपारी अडीच वाजता जेवणानंतर होणार आहे. याप्रकरणी न्यायालयात अंतिम युक्तिवाद केला जाणार आहे. न्यायमूर्ती हेमंत एम पृच्छक यांनी अधिक वेळ देणार नसल्याचे सांगितल्याने आहे. त्यामुळे त्याच दिवशी निकाल येण्याची शक्यता आहे.

न्यायमूर्ती हेमंत एम पृच्छक म्हणाले की, ते ५ मेपासून बाहेर जात आहेत. त्यामुळे ते लवकरच हे प्रकरण निकाली काढतील. तर अभिषेक मनू सिंघवी यांनी याचे स्वागत केले.

काय आहे प्रकरण?

२३ मार्च रोजी सुरतच्या CJM न्यायालयाने राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये मोदी आडनावाबाबत केलेल्या टिप्पणीप्रकरणी कलम ५०४ अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र न्यायालयाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ३० दिवसांची मुदतही दिली होती.

राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्नाटकातील कोलारमध्ये एका रॅलीत ललित मोदी, निरव मोदी, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नाव कॉमन का आहेत? सगळ्या चोराचे नाव मोदी का असतं? असं वक्तव्य केलं होतं.

त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT