Rahul Gandhi and Home Minister Amit Shah exchange sharp words during the heated debate in the Lok Sabha. saam tv
देश विदेश

Rahul Gandhi vs Amit Shah: राहुल गांधींचं ओपन चॅलेंज,अमित शहा भडकले; भर संसदेत तुफान शाब्दिक राडा

Massive Verbal War Between Rahul Gandhi and Amit Shah : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राहुल गांधी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात तुफान खडाजंगी झाली. एसआयआर आणि मतदार यादीच्या वादावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

Bharat Jadhav

  • संसदेत SIR चर्चेदरम्यान राहुल गांधी आणि अमित शहा यांच्यात तुफान खडाजंगी झाली आहे.

  • राहुल गांधींनी गृहमंत्र्यांना भर सभागृहात चर्चेंचे ओपन चॅलेंज दिले.

  • मतदार यादीतील कथित मतचोरीवरून भाजप–काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी होतेय. SIR वर सुरू असलेल्या चर्चादरम्यान राहुल गांधी आणि अमित शहा यांच्यात खडाजंगी झाली. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भरसभागृहात केंद्रीय गृहमंत्र्यांना चर्चेसाठी ओपन चॅलेंज दिलं. त्यावेळी व्होट चोरीच्या आरोपांवर गृहमंत्री अमित शहा उत्तर देत होते. राहुल गांधींनी चॅलेंज देताच केंद्रीय गृहमंत्री संतापले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत विरोधकांवर देशातील मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR) बद्दल खोटेपणा पसरवल्याचा आरोप केला. हरियाणा विधानसभा निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले. यामुळे राहुल गांधी आणि अमित शहा यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

राहुल गांधी सभागृहात उभे राहिले आणि पत्रकार परिषदेत अमित शहांना चर्चेचे आव्हान दिले. त्यानंतर अमित शाह संतापले. "संसद अशा प्रकारे चालणार नाही. मी कसं बोलायाचं? कशा क्रमाने बोलेन हे मी ठरवेन." असं अमित शहा म्हणालेत. अमित शहा यांच्या भाषणादरम्यान राहुल गांधींना उत्तर देण्याची संधी देण्यात आली. ते म्हणाले, "काल मला एक प्रश्न पडला होता की मुख्य निवडणूक आयुक्तांना पूर्ण प्रतिकारशक्ती दिली जाणार का.

यामागील उद्देश काय सांगा. हरियाणामध्ये अनेक उदाहरणे आहेत. तेथे १९ लाख बनवाट मतदार आहेत. खरंतर आपण माझ्या पत्रकार परिषदेत चर्चा करू. अमित शहाजी मी तुम्हाला चॅलेंज करतो की, तुम्ही माझ्यासोबत प्रेस कॉन्फ्रेसमध्ये चर्चा करायला या. राहुल गांधींचे चॅलेंज ऐकल्यानंतर अमित शहा भडकले.

यावर अमित शहा यांनी नाराजी व्यक्त करत राहुल गांधींना ठणकावून सांगितलं. "सर्वप्रथम, मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी गेल्या ३० वर्षांपासून विधानसभा आणि संसदेत निवडून आलोय. संसदीय व्यवस्थेचा व्यापक अनुभव आहे." त्यावर राहुल गांधी म्हणाले, आधी माझ्या मुद्द्याचे उत्तर द्यावे, मला ऐकायचे आहे." राहुल गांधींच्या अशा मध्येच बोलण्यावर अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. संतापत त्यांनी संसद तुमच्या इच्छेनुसार चालणार नाही.

मी कोणत्या क्रमाने बोलेन ते मी ठरवेन." ते जे काही बोलतील त्याला मी उत्तर देईन, पण ते माझ्या भाषणाचा क्रम ठरवू शकत नाही, ते मी ठरवेन. राहुल गांधी उभे राहिले आणि म्हणाले, "ही एक बचावात्मक प्रतिक्रिया आहे, चिंताग्रस्त आणि घाबरलेली उत्तर आहे. ही खरी प्रतिक्रिया नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिकेसाठी दिल्लीत 'पॉवर' गेम? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

Kanda Batata Rassa Bhaji Recipe: झणझणीत कांदा बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची?

तपोवन शेजारी शेकडो वृक्षांचा कत्तलेआम, वृक्ष आणि विरोधावर सरकारची कु-हाड

Zila Parishad-Corporation Election: जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली तारीख

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील बर्गेवाडी मध्ये भीषण आग

SCROLL FOR NEXT