Rahul Gandhi On Share Market Price 
देश विदेश

Rahul Gandhi: निकालादिवशी 30 लाख कोटींचा स्कॅम; स्टॉक मार्केटवरून राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप

Rahul Gandhi On Share Market Price : शेअर बाजारातील घसरणीवरून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर राहुल गांधींनी गंभीर आरोप केलेत. रिटेल गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी रुपयांचं नुकसान होणं, हा शेअर बाजारातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचं राहुल गांधी म्हणालेत.

Bharat Jadhav

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेताच राहुल गांधींनी आक्रमक भूमिका घेतलीय. निकालादिवशी झालेल्या शेअर बाजारातील घसरुणीवरून राहुल गांधींनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. शेअर बाजारातील उसळी हा मोठा घोटाळा असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केलाय.

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल 1 जून 2024 रोजी जाहीर झाले. त्यानंतर शेअर बाजाराने 3 जून रोजी सर्व विक्रम मोडले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर झाले. त्यावेळी शेअर बाजार कोसळला. यावरुन राहुल गांधी यांनी मोदी आणि अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर गंभीर आरोप केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी एक्झिट पोलवर टीका केली. खोट्या एक्झिट पोलचा शेअर बाजारावर परिणाम झाला. नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्र्यांनी वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत लोकांना शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत होते, असा आरोप राहुल गांधी केला.

"निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्री यांनी शेअर बाजारावर भाष्य केले होतं. शेअर बाजार वेगाने पुढे जाईल आणि लोकांनी शेअर्स खरेदी करावेत, असे सांगितलं. त्यानंतर 1 जून रोजी मीडियाने खोटे एक्झिट पोल प्रसिद्ध जाहीर केले. यात भाजप 220 जागा जिंकेल असं सांगण्यात आलेत. त्यानंतर त्यानंतर "३ जून रोजी शेअर बाजारात उसळी आली आणि सर्व विक्रम मोडल्याचं राहुल गांधी म्हणाले.

त्यावरुन मोदी आणि शहा यांना घेरताना राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधानांनी लोकांना गुंतवणुकीचा सल्ला का दिला? अमित शाह यांनी लोकांना शेअर्स खरेदी करण्यास का सांगितले? भाजप आणि या परदेशी गुंतवणूकदारांचा काही संबंध काय आहे? असे प्रश्न राहुल गांधींनी विचारलेत. याप्रकरणी नरेंद्र मोदींची भूमिका आणि जेपीसी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केल्याचं राहुल गांधी म्हणालेत. दरम्यान हे प्रकरण खूप मोठे असून हा अदानीशी संबंधित असल्याने हा खूप मोठा मुद्दा आहे. तसेच विषय थेट पंतप्रधानांशी संबंधित आहे. भाजपमध्ये मोठ्या पदावर असलेल्या लोकांनी हा घोटाळा केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला

मोठ्या पदावर असलेल्या लोकांनी हा घोटाळा का केला. एक्झिट पोल जाहीर करणारे आणि त्यांच्यात काहीतरी संबंध असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला. दरम्यान या प्रकरणात पंतप्रधान आणि गृहमंत्री यात थेट सहभागी आहेत, म्हणून जेपीसीचा तपास झाला पाहिजे. यात मोदी आणि शहा यांचा समावेश आहे.

भाजपच्या बड्या नेत्यांनी रिटेल गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी करण्याचे सल्ले दिले. लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल हे चुकीचे आहेत, भाजपला बहुमत मिळणार नाही हे माहिती होतं म्हणून त्यांनी हे केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. त्यामुळे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यातून सत्तेतील लोकांना फायदा झाल्याचं राहुल गांधी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Alert : राज्यात तापमानात चढ उतार, पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका वाढणार, वाचा हवामानाचा अंदाज

दुर्दैवी! भारतीय जवानाचा लेकीच्या जन्माआधीच मृत्यू, पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आला होता सुट्टीवर, सातारा शोकसागरात

Maharashtra Live News Update : आज ठाकरे बंधू यांची जाहीर सभा शिवाजी पार्कवर होणार

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मकरसंक्रातीला खुशखबर मिळणार? खात्यात ₹३००० येण्याची शक्यता

Rare Raj Yoga 2026: 24 वर्षांनंतर या राशींचं चमकणार भाग्य; बुधादित्यसह बनणार ३ दुर्लभ राजयोग, प्रेम जीवनात येणार आनंद

SCROLL FOR NEXT