Sharad Pawar Meets Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

Sharad Pawar Meets Rahul Gandhi: विरोधकांचं ठरलं! वज्रमुठ घट्ट; शरद पवार यांच्या भेटीनंतर राहुल गांधी म्हणाले...

Rahul Gandhi : शरद पवार यांच्या भेटीनंतर राहुल गांधी म्हणाले...

Satish Kengar

Sharad Pawar Meets Rahul Gandhi : लोकसभा निवडणूक 2024 ची तयारी विरोधी पक्षांनी सुरू केली आहे. गुरुवारी शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. यापूर्वी नितीश कुमार यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली होती. काँग्रेस नेत्यांची शरद पवारांसोबतची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असलेले शरद पवार हे विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. अलीकडेच अदानी समूहाच्या जेपीसी चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. यावर शरद पवार यांनी आपली वेगळी भूमिका मांडली होती. यातच गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले की, आम्ही सर्व एक आहोत.  (Latest News Update)

Mallikarjun Kharge on Sharad Pawar: बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले...

या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, शरद पवार मुंबईहून आम्हाला भेटायला आले. याचा आम्हाला आनंद आहे. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. बुधवारी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्याशी चर्चा झाली. आम्ही देशातील विरोधकांना एकसंध ठेवू. देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकजुटीने लढण्यास तयार आहोत, असे ते म्हणाले.

Sharad Pawar: सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा व्हायला हवी : शरद पवार

बैठकीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत की, '''सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा व्हायला हवी. विरोधकांना एकत्र करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायला हवं.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT