अहमदाबाद येथील काँग्रेसच्या ८४ व्या अधिवेशनात काँग्रेस खासदार राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केलीय. पंतप्रधान मोदी आणि आरएसएसला जातीय जनगणना करायची नाहीये, असं स्पष्ट केलंय. पण काँग्रेस जातीय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा वाढवणार असल्याचं प्रतिपादन राहुल गांधी यांनी केलं.
जाती जनगणनावरून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी नेहमी ओबीसी, दलित आणि आदिवसीविषयीच्य गप्पा मारतात, पण जेव्हा भागीदारीची गोष्ट येते तेव्हा ते शांत बसतात. जर तुम्ही अदानी आणि अंबानींच्या कंपन्यांच्या व्यवस्थापन यादीवर नजर टाकली तर त्यात तुम्हाला एकही दलित, आदिवासी किंवा मागासलेला व्यक्ती सापडणार नाही. पण डिलिव्हरी बॉय कामगाराच्या यादीत दलित आणि ओबीसी तरुण मिळतील, असं विधान राहुल गांधींनी केलंय.
मजुरांना गिग कामगार म्हणतात. ते घरी अन्न घेऊन जातात आणि ते अन्न शिजवतात. ते अॅमझॉनवरून डिलिव्हरी घेतात आणि रस्त्यावर मरतात. तेलंगणामध्ये जेव्हा आम्ही जातीच्या जनगणनेचा डेटा प्रसिद्ध केला आहे. तेव्हा अशा लोकांची यादी काढली गेली, त्यात ते सर्व दलित, ओबीसी किंवा आदिवासी होते. तेलंगणातील जात जनगणनेने एक नवीन साधन दिले आहे. याद्वारे आपण विकासाचे काम करू शकतो. तेलंगणातील प्रत्येक क्षेत्रातील सहभागाबद्दल आम्ही अचूकतेने सांगू शकतो. तेथील जातीय जनगणनेनंतर लगेचच आमचे मुख्यमंत्री आणि आमच्या टीमने ओबीसी आरक्षण ४२ टक्क्यांपर्यंत वाढवले, असं राहुल गांधी म्हणाले.
जर आपण खाजगी क्षेत्राबद्दल बोललो तर ९० टक्के लोक तिथे नाहीत. पंतप्रधान मोदी नेहमीच ओबीसी, दलित आणि आदिवासींबद्दल बोलतात, परंतु सहभागाच्या बाबतीत ते गप्प बसतात. जातीय जनगणना करून तेलंगणाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. त्यातून संपूर्ण देशाला मार्ग दाखवला. आम्ही देशभरातील ५० टक्के आरक्षणाची भिंत तोडून टाकू.तेलंगणामध्ये जे काही सुरू केलंय, तेच आम्ही संपूर्ण भारतासाठी दिल्लीत करणार आहोत, असं विधान राहुल गांधींनी केलं.
अधिवेशनात बोलताना राहुल गांधी म्हणाले, १०० वर्षांपूर्वी महात्मा गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले आणि १५० वर्षांपूर्वी सरदार पटेलजींचा जन्म झाला. ते दोघेही काँग्रेस पक्षाचा पाया आहेत. त्यांनी सांगितले की मी मागासवर्गीयांसाठी काम करत आहे." तेलंगणामध्ये जात जनगणना करत आम्ही एक क्रांतिकारी पाऊल उचलले. "या देशात कोणाचा सहभाग किती आहे, हे आपल्याला शोधायचे होते. मी संसदेत पंतप्रधान मोदींना सांगितले की तुम्ही जातीय जनगणना करा. देशाला हे माहित असले पाहिजे की किती दलित आहेत, किती मागास लोक आहेत, किती गरीब सामान्य वर्गातील लोक आहेत, असं राहुल गांधी म्हणालेत.
भाजप भारतातील सर्व संस्थांवर हल्ला करत आहे. जिथे मागासवर्गीय आणि दलितांना जागा मिळत होती, तिथे आता ते मार्ग बंद करत आहेत. आधी प्रत्येक समुदायातील तरुण सैन्यात सामील होऊ शकत होते. आधी सैनिकांना पगार, पेन्शन आणि माजी सैनिकांचा दर्जा देण्यात आला होता. आता भाजपने सगळं संपवलं. आज सरकार म्हणते की जर तुम्ही युद्धात शहीद झालात आणि तुम्ही अग्निवीर असाल.
त्यामुळे कुटुंबाला पेन्शन मिळणार नाही, ना तुम्हाला शहीदांचा दर्जा. मार्ग कोणासाठी बंद करण्यात आले, गरीब, दलित, मागासलेले आणि अत्यंत मागासलेले आणि आदिवासींसाठी. आधी बीएसएनएल, एचएएल सारखे सार्वजनिक क्षेत्र होते. तेथे प्रत्येक जातीचे लोक तिथे जाऊ शकत होते. परंतु ते आता बंद करण्यात आले असल्याची टीका करण्यात आलीय. जर आपण अदानी आणि अंबानी यांच्या कंपन्यांच्या व्यवस्थापन यादीवर नजर टाकली तर तुम्हाला एकही दलित, आदिवासी किंवा मागासलेला व्यक्ती सापडणार नाही. ९० टक्के लोकांसाठी काहीही उरले नाही. त्यांच्याकडे फक्त गरिबी आणि बेरोजगारी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.