Rahul Gandhi Saam tv
देश विदेश

राहुल गांधींनी चिमुकलीला दिला चॉकलेट, सेल्फी घेतला; देशाला असं वातावरण हवंय!, काँग्रेसचं ट्विट

राहुल गांधी आणि या चिमुकलीमधील गोड संवादाचा आणि भेटीचा व्हिडिओ काँग्रेसने (congress) त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या केरळच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा तीन दिवसीय दौरा शुक्रवारपासून सुरू झाला होता. या दौऱ्यात दुसऱ्या दिवशी, शनिवारी राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातील अनेक भागांना भेट दिली. त्याचवेळी त्यांची एका लहान मुलीसोबत भेट झाली. त्यांच्यातल्या संवादाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे.

राहुल गांधी हे वायनाडमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका चिमुकलीनं त्यांचं स्वागत केलं. कारमध्ये बसलेल्या राहुल गांधी यांनी त्या मुलीला आधी तिचं नाव विचारलं. त्यानंतर तिला कारमध्ये बसवलं. त्यानंतर राहुल गांधींनी तिला चॉकलेट दिला. राहुल गांधी आणि या चिमुकलीमधील गोड संवादाचा आणि भेटीचा व्हिडिओ काँग्रेसने (congress) त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला. त्याखाली एक कॅप्शन लिहिली आहे. देशाला अशा वातावरणाची आवश्यकता आहे, असं त्यात काँग्रेसनं म्हटलं आहे.

२२ सेकंदाचा व्हिडिओ, कॅप्शनमध्ये राहुल गांधींचं कौतुक

काँग्रेसने ट्विटर हँडलवर वायनाड येथे राहुल गांधी आणि मुलीच्या भेटीचा आणि त्यांच्यातील संवादाचा २२ सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात राहुल गांधी या मुलीला तिचं नाव विचारत आहेत. तसेच तू माझ्यासोबत येत आहेस का, अशी विचारणा केली. त्यावर ती मुलगी थेट कारमध्ये चढली. राहुल गांधी यांनी तिला चॉकलेट दिला. त्यानंतर तिच्यासोबत सेल्फीही काढला. हा व्हिडिओ पोस्टमध्ये कॅप्शनही लिहिली आहे. खोट्या स्क्रिप्टेट प्रपोगंडाने भरलेल्या वातावरणात खरं तर देशाला दयाळू आणि करुणामय अशा क्षणांची आवश्यकता आहे, असं त्यात नमूद केलं आहे.

Edited By - Nandkumar joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT