Rahul Gandhi news saam tv
देश विदेश

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; हायकोर्टाकडून FIR दाखल करण्याचे आदेश, काय आहे प्रकरण?

rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या अडचणीत वाढ झाली आहे. हायकोर्टाने त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिलेत.

Vishal Gangurde

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ

कोर्टाने गांधींच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे दिले निर्देश

कोर्टाकडून केंद्रीय यंत्रणाकडून चौकशी करण्याचे निर्देश

कथित दुहेरी नागरिकत्व प्रकरणात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधींच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ घटनापीठाने राहुल गांधींच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या सुनावणीदरम्यान एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणात चौकशी करून कायदेशीर कारवाईचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यामुळे राहुल गांधींचं टेन्शन वाढलं आहे.

राहुल गांधी यांच्यावर दुहेरी नागरिकत्वाचे आरोप करण्यात आले होते. यावरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीनंतर कोर्टाने गांधींच्या विरोधात एपआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ पीठाने म्हटलं की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या दुहेरी नागरिकत्वाच्या आरोपाची चौकशी केली पाहिजे. कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात केंद्रीय यंत्रणाच्या द्वारे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

भाजप कार्यकर्ते एस विग्नेश शिशिर यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांनी लखनौच्या स्पेशल एमपी/एमएलए कोर्टात २८ जानेवारी रोजी आव्हान दिलं होतं. परंतु काँग्रेस नेत्याच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची याचिका फेटाळून लावली होती. कनिष्ठ न्यायालयाने नागरिकत्वाशी संबंधित प्रकरणात निर्णय देण्यास सक्षम नसल्याचे म्हटलं होतं.

कर्नाटकचे रहिवासी असलेल्या याचिकाकर्त्याने भारतीय दंड संहिता, शासकीय गुपित कायदा, विदेशी नागरिक कायदा आणि पासपोर्ट कायद्यांअंतर्गत आरोप केले आहेत. एफआयआर नोंदवून सखोल चौकशीची मागणी केली. त्यानंतर १७ डिसेंबर २०२५ रोजी हायकोर्टाने प्रकरण लखनौ कोर्टात पाठवले. लखनौ कोर्टात याचिका फेटाळून लावल्यानंतर याचिकाकर्त्याने हायकोर्टात धाव घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरचा धोका टाळायचा आहे? आजच आहारातून गायब करा 'हे' ५ पदार्थ; आठवड्याभरात दिसेल फरक

पुण्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित काळाच्या पडद्याआड, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत पटकावले होते स्थान

Maharashtra News Live Update: नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अटक, आज कोर्टात हजर करणार

Ladki Bahin Yojana: ₹४५००, ₹३००० की ₹१५००; लाडक्या बहिणींच्या खात्यावर किती रूपये येणार? मार्च-एप्रिल अन् मे महिन्याचा हप्ता रखडला

Rice Water Benefits : दररोज एक ग्लास प्या तांदळाचे पाणी; चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूमे अन् सुरकुत्या होतील कमी

SCROLL FOR NEXT