Rahul Gandhi latest news saam tv
देश विदेश

काँग्रेस सोमावारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; केंद्र सरकार बरखास्त करण्याची गरज-राहुल गांधी

NDIA Alliance Demands Ballot Paper Elections: इंडिया आघाडीनं राहुल गांधींच्या नेतृत्त्वात सरकारविरोधात आणखी एक नवी रणनीती आखलीय. तसंच ज्ञानेश कुमारांसह थेट मोदी सरकार हटवण्याबाबत राहुल गांधींनी मोठं विधान केलंय. नेमकी काय आहे रणनीती आणि काय आहे राहुल गांधींचं विधान? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Rohit Kadam

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारामुळे संपूर्ण देश ढवळून निघालाय. त्यातच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी रस्त्यावर उतरलीये. सलग 3 दिवस दिल्लीत काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडीनं दिल्ली दणाणून सोडली. संविधान सदनातील बैठकीनंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी इंडिया आघाडीनं राष्ट्रपतींकडे चार मागण्या केल्यात. त्या कोणत्या आहेत ते पाहूयात...

इंडिया आघाडीच्या राष्ट्रपतींकडे 4 मागण्या

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन त्यांना सुरक्षा देणारा 2023 चा नवा कायदा रद्द करावा.

SIR तात्काळ रद्द करून 13 कोटी 30 लाख मतदारांचा पुन्हा मतदार यादीत समावेश करावा

आगामी सर्व निवडणुका बॅलट पेपर वर घ्याव्यात

मतचोरीचे ठोस पुरावे आढळून आल्यानं गेल्या 2 वर्षांतील सर्व विधानसभा निवडणुका रद्द कराव्यात

विशेष म्हणजे, राष्ट्रपतींनी यावेळी विरोधी पक्षांना पुरावे सादर करण्यास सांगितलंय. तर दुसरीकडे, राष्ट्रपतींच्या भेटीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी राष्ट्रपती भवनातच ठिय्या मांडला होता. मात्र, राष्ट्रपतींच्या भेटीआधी इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधींनी थेट केंद्र सरकार बसखास्त करण्याची गरज असल्याचं मोठं विधान केलंय. त्यावर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जोरदार पलटवार केलाय.

निवडणूक आयोगावर मनमानीचा आरोप करत ठिकठिकाणी निदर्शने केली जाताहेत. तर दुसरीकडे, मतचोरी विरोधातील लढ्यात दोन गुन्हे दाखल झाल्यानंतरही राहुल गांधींचा आक्रमक पवित्रा कायम आहे. तसंच, ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी येत्या सोमवारी इंडिया आघाडीचे नेते सरन्यायाधीशांना भेटून त्यांना निवेदन देणार आहेत. मात्र, राहुल गांधींनी थेट आता सरकार हटवण्याचे संकेत दिल्यानं इंडिया आघाडी आणि सत्ताधाऱ्यांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10K Steps vs Cardio: १० हजार स्टेप्स चालणे की ३० मिनिटे कार्डिओ? वजन कमी करण्यासाठी कोणती उपाय आहे बेस्ट?

जंतर मंतरवर राजकीय नेत्यांची धरपकड; 4 माजी मुख्यमंत्री दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

नाशिकमधील धक्कादायक घटना; 22 मृत रुग्णांवर 6 वर्षानंतर उपचार; 3 हॉस्पिटल्सनं शासनाला लावला 2 कोटींचा चुना

Maharashtra News Live Update: मुंबईत ताब्यात घेतलेल्या ६०० आंदोलकांची सुटका

Chaniya Choli Designs: गरबा नाईटमध्ये सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील! ट्राय करा हे ७ चनिया चोळी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT