Rahul Gandhi Saam tv
देश विदेश

Rahul Gandhi on Nitish Kumar: नितीश कुमारांच्या भूमिकेवर राहुल गांधी मनातलं बोलले, भरसभेत जोक सांगितला

Rahul Gandhi Latest News: जनता दल यूनाइटेड पक्षाने पुन्हा 'एनडीए'त सहभागी होत नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्या भूमिकेवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे.

Vishal Gangurde

Rahul Gandhi Latest News:

नितीश कुमार यांच्या भूमिकेमुळे बिहारचं राजकारण तापलं आहे. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत एनडीएमध्ये सहभागी झाले आहेत. जनता दल यूनाइटेड पक्षाने पुन्हा 'एनडीए'त सहभागी होत नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्या भूमिकेवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. (Latest Marathi News)

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. ही यात्रा बिहारमध्ये आली आहे. या यात्रेत राहुल गांधी यांनी उपस्थितांना संबोधित केले. 'थोडा दबाव टाकला आणि त्यांनी यू-टर्न घेतला, असा टोला राहुल गांधींनी लगावला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राहुल गांधींनी सांगितला जोक

राहुल गांधी म्हणाले, 'अखिलेश यादव यांचं भाषण सुरु होतं. त्यावेळी बघेल यांनी जोक सांगितला. त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल जोक सांगितला. तुमचे मुख्यमंत्री हे राज्यपालांकडे शपथ घेण्यासाठी गेले. तिथे भाजप नेते आणि राज्यपाल बसले होते. तिथे जाऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ आणि इतर नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तिथून घराकडे निघाले. मात्र, त्यांची शाल राज्यपालांकडे राहते. त्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्या कारचालकाला राज्यपालांच्या घरी पाठवतात'.

'कारचालकाने राज्यपालांच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर दरवाजा उघडून राज्यपाल म्हणाले,'अरे, तुम्ही इतक्या लवकर पुन्हा आले?'. अशी बिहारची स्थिती आहे. त्यांच्यावर थोडा दबाव आला की, ते लगेच यूटर्न घेतात', असा जोक राहुल गांधी यांनी सांगितला.

राहुल गांधींची नितीश कुमार यांच्यावर टीका

'नितीश कुमार कशामुळे अडकले, हे समजून घ्या. मी त्यांना म्हटलं की, बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करायला हवी. मी आरजेडी पक्षाच्या मदतीने नितीश कुमार यांना सर्व्हे करण्यास भर देण्यास सांगितलं. मात्र, भाजप घाबरली. कारण ते या जनगणनेच्या विरोधात आहेत. त्यामुळे नितीश कुमार अडकले. खरंतर लोकांना सामाजिक न्याय मिळवून देणे आघाडीची जबाबदारी आहे. त्यामुळे नितीश कुमार यांची गरज नाही, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT