Prime Minister Narendra Modi news Saam Tv
देश विदेश

एक वर्षात सरकार कोसळेल; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

rahul gandhi on modi government : पुढील एका वर्षात केंद्र सरकार कोसळणार असल्याचा खळबळजनक दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलाय. मात्र राहुल गांधींनी हे विधान का केलंय? त्यावरुन भाजप नेते कसे आक्रमक झालेत ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

नवी दिल्लीत काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीची एक बैठक पार पडली. दोन तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या बैठकीत राहुल गांधी यांनी देशाच्या राजकारणाबाबत खळबळजनक दावा केलाय. पुढील एका वर्षात सरकार कोसळेल, असं विधान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलयं. देशातील वाढता असंतोष आणि महागाई याबद्दल बोलताना काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींनी कोणतं भाकीत केलयं ? पाहूयात...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढील वर्षात पदत्याग निश्चित आहे... देशातील हिंदू- मुस्लीम राजकारण लवकर संपणार... गरीब आणि श्रीमंत हा प्रमुख मुद्दा कायम राहणार आहे... तसचं महागाईचा मुद्दाही महत्त्वाचा आहे... देशातील आर्थिक असंतोषामुळे जनतेत नाराजी असून वाढल्या असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होईल, असं भाकीत राहुल गांधींनी अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत केले आहे. दरम्यान यावर भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. ही मुंगेरीलाल सारखी दिवास्वप्न असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलीय.

याआधी सुद्धा राहुल गांधींनी केंद्र सरकारवर अनेकदा टीका केलीय...2024 च्या निकालानंतर नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू यांनी बाजू बदलली, तर हे सरकार एका मिनिटात कोसळेल, असं विधान त्यांनी केलं होतं...त्यात आता 1 वर्षांनी सरकार कोसळण्याचं हे भाकीत फक्त राजकीय दबाव आणण्यासाठी आहे की देशाच्या राजकारणात खरोखरच भविष्यात मोठी घडामोड घडणार ? हे येणारा काळच ठरवेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Cancer: सकाळी वारंवार डोकं दुखतंय? डोकेदुखी ठरू शकते धोक्याची घंटी

Women Understanding: स्त्रियांबद्दलच्या 'या' गोष्टी पुरुषांना कधीच समजत नाहीत; ५ वी गोष्ट वाचून थक्क व्हाल

Crime News: एमआयएमच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला; चंद्रपूर हादरलं!

Panvel Fort : पनवेलजवळील 'हा' किल्ला एकदा नक्की पाहा, सह्याद्रीत लपलाय १८व्या शतकातील भव्य इतिहास

Maharashtra News Live Update: शहापूरमध्ये ढगफुटीचा तडाखा; धबधब्यावर आलेले पाच पर्यटक पुरात वाहून गेले, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT