Kriti Sanon Trolled Over Outfit; Rahul Gandhi Gives Strong Support saam tv
देश विदेश

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

Rahul Gandhi Supports Kriti Sanon Over Raksha Bandhan Ad Trolling: रक्षाबंधनच्या जाहिरातीतील कपड्यांवरून अभिनेत्री कृति सेननला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. यावर राहुल गांधींनी तिची पाठराखण करत महिलांच्या कपड्यांवरून आणि वैयक्तिक निवडीवरून टीका करणं थांबवलं पाहिजे, अशी सडेतोड भूमिका मांडली.

Omkar Sonawane

लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी अभिनेत्री क्रिती सेनन हिची पाठराखण केली आहे. रक्षाबंधनच्या एका जाहिरातीच्या तिच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर टीका केली गेली. मोठ्या प्रमाणात तिला ट्रोल केलं गेलं. यावरच आता राहुल गांधी यांनी तिला पाठिंबा दिला. राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हटलं की, एक महिला कोणत्या प्रकारचे कपडे घालते, काय करते आणि कुठे जाते हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे. महिलांनी आपल्या स्वातंत्र्याचा वापर केल्यामुळे त्यांना ट्रोल करणं थांबवलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं. महिलांच्या कपड्यावर आणि त्यांच्या जीवनशैलीच्या निवडीवर टीका करणं योग्य नाही अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.

या टीकेनंतर क्रिती सेनननेही सोशल मीडियावर सडेतोड उत्तर दिलं. एखाद्या महिलेचा तिच्या संस्कृती आणि परंपरेबद्दलचा आदर तिच्या कपड्यांवरून का ठरवला जातो, असा सवाल तिने केला. क्रिति म्हणाली की, संस्कृती आणि परंपरा माझ्या हृदयात असतात, माझ्या गळ्याच्या डिझाइनमध्ये नाहीत. महिलांनी काय घालावं, हे सांगणं आपण कधी थांबवणार? वर्षानुवर्षे पारंपरिक फॅशनमध्ये बदल झाले असले तरी सांस्कृतिक परंपरांच्या बाबतीत महिलांच्या कपड्यांवरूनच त्यांचं मूल्यमापन केलं जातं, अशी खंतही तिने व्यक्त केली.

रक्षाबंधन जाहिरातीवरून वाद

एका दागिन्यांच्या ब्रँडच्या रक्षाबंधन जाहिरातीत क्रिती सेनन दिसली होती. या जाहिरातीत ती आयव्हरी रंगाची ब्रालेट आणि स्कर्टसह केप परिधान करून भावाच्या हातावर राखी बांधताना दिसते. जाहिरातीत तिचा पाळीव कुत्राही दिसत असून, नंतर क्रिती त्या कुत्र्याच्या पायालाही राखी बांधते. यावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. काहींनी तिच्या कपड्यांना पारंपरिक सणासाठी अयोग्य म्हटलं, तर काहींनी कुत्र्याला राखी बांधण्यावर आक्षेप घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: काळ्या बुरशीचा कांदा खाल, जीवानं जाल? बुरशीयुक्त कांद्यामुळे किडनी, लिव्हरला धोका?

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

SCROLL FOR NEXT