Shreya Maskar
'रॉकस्टार' फेम अभिनेत्री नर्गिस फाखरी वयाच्या ४६ व्या वर्षीही फिट अँड फाईन दिसते. नर्गिस अनेकदा सोशल मीडियावर फिटनेस टिप्स, फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
नर्गिस हेल्दी राहण्यासाठी दररोज एक गोष्ट करते, ज्यामुळे तिचे शरीर सक्रिय आणि तंदुरुस्त राहते. तंदुरुस्त शरीरासाठी नर्गिसचा सोपा फॉर्म्युला म्हणजे सातत्य आणि ती आपला दिनक्रम कधीही चुकवत नाही.
नर्गिस अलिकडेच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने खुलासा केला की, ती दररोज सुमारे २४ किमी सायकल चालवते. यामुळे तिचे शरीर तंदुरुस्त आणि सक्रिय राहते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सायकलिंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सायकलिंगमुळे हृदय मजबूत होते, वजन कमी होण्यास मदत होते, पायांचे स्नायू बळकट होतात आणि तणाव कमी होतो.
नर्गिस दररोज २४ किमी सायकल चालवते, एकही दिवस चुकवत नाही. तिचा विश्वास आहे की, जेव्हा तुम्ही एखादे काम पूर्ण समर्पणाने करता, तेव्हाच तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकतात.
नियमित व्यायाम आणि योग्य आहार तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यास मदत करू शकतो. अभिनेत्री तणाव टाळते आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते.
नर्गिस अंडी, भाज्या, फळे, चिकन आणि मासे खाते. नर्गिस आरोग्यदायी आहार घेते आणि भूक लागल्यावर बदाम, काजू आणि मखाना खाते. तसेच अनेक मिडिया मुलाखतीत ती आपल्या डाएटबद्दल सांगते.
नर्गिस फाखरी प्रक्रिया केलेले, जंक फूड आणि साखर टाळते. जेव्हा तिला गोड खाण्याची इच्छा होते, तेव्हा ती डार्क चॉकलेट खाते.