Shreya Maskar
कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनऐवजी हातांचा वापर केल्यास, तुम्हाला खांदे आणि हातांचा वेगळा व्यायाम करण्याची गरज भासणार नाही. कपडे धुण्यामुळे तुमच्या हातांना चांगला व्यायाम मिळतो, ज्यामुळे बारीक होण्यास मदत होईल.
बसून आणि वाकून घर पुसणे हा एक उत्तम व्यायाम आहे. जर तुमच्याकडे जिममध्ये जाण्यासाठी वेळ नसेल, तर दररोज बसून संपूर्ण घर पुसण्याचा प्रयत्न करा. यासाठी पाय वाकवावे लागतात. यामुळे तुमच्या पोटावर दाब वाढतो आणि स्नायूंचा ताण वाढतो, ज्यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
तुम्ही जर बिल्डिंगमध्ये राहत असाल तर नियमित १०-१५ मिनिटे पायऱ्या चढा आणि उतरा. हा तुमच्या पायांसाठी तसेच संपूर्ण शरीरासाठी एक परिपूर्ण व्यायाम आहे.
खणणे, गवत काढणे आणि वाकून काम करणे यांसारख्या क्रियांमुळे पाय, पाठ आणि पोटाच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो आणि तासाला २०० ते ४०० कॅलरीज खर्च होतात.
टाइल्स घासणे, भिंती पुसणे आणि टब धुणे यांसारख्या कामांमुळे संपूर्ण शरीराचा 'रेझिस्टन्स वर्कआउट' (स्नायूंना ताण देणारा व्यायाम) होतो, ज्यामध्ये तासाला सुमारे १५० ते ३०० कॅलरीज खर्च होतात.
सतत वाकणे, काही प्रमाणात जड वस्तू उचलणे आणि पुढे-मागे चालणे यामुळे शरीराची स्ट्रेचिंग होते. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते.
घरकाम केल्याने तुमचे शरीर सहजपणे सडपातळ होईल आणि पोटावरील चरबी नाहीशी होईल. तसेच घर देखील वेळोवेळी स्वच्छ होत राहील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.