Rahul Gandhi Slams BJP ANI
देश विदेश

Rahul Gandhi: राष्ट्रवादी-शिवसेना फोडण्यासाठी इलेक्टोरल बॉन्डच्या पैशाचा वापर; राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Rahul Gandhi Slams BJP: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी इलेक्टोरल बाँड्सवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. इलेक्टोरल बाँड हे जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट आहे. सीबीआय आणि ईडीकडून दबाव टाकून भाजप यातून वसुली करते असा आरोप त्यांनी केलाय.

Bharat Jadhav

Rahul Gandhi PC On Electoral Bond :

राहुल गांधी यांनी इलेक्टोरल बॉन्डवरून भाजपवर आरोपांचा हल्लाबोल केला. इलेक्टोरल बॉन्ड हा गंभीर मुद्दा असून हे जगातील सर्वात मोठे खंडणी वसूल करण्याचे रॅकेट असल्याचा आरोप त्यांनी केला. याच इलेक्टोरल बॉन्डच्या मदतीने भाजप महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडली, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला. राहुल गांधी यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट कशामुळे पडली याची कारणं सांगितलं.(Latest News)

इलेक्टोरल बॉन्डच्या मदतीने भाजप खंडणी वसूल करत आहे. हे जगातील सर्वात मोठं खंडणी वसूली रॅकेट आहे. हे जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट आहे. कंपन्यांकडून पैसे घेण्याचा हा एक मार्ग आहे. आधी सीबीआय, ईडी आणि आयटीकडून कंपन्यांवर गुन्हा दाखल होतो आणि मग भाजपला पैसे मिळत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. भाजपने याच पैशांचा वापर करत महाराष्ट्रातील दोन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान महाराष्ट्रात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षात प्रवेश केला. त्यावरही राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत भाष्य केलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला परंतु काँग्रेस पक्ष अजून भक्कमपणे उभी त्यात फूट पडली नाही तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडलीय. ही फूट या बॉन्डच्या पैशाच्या मदतीने केली.

मोदींच्या दाव्याचे वास्तव समोर आले आहे. देशातील सर्व यंत्रणा भ्रष्टाचारात गुंतल्यात. सीबीआय आणि ईडी तपास करत नाहीत तर भाजपसाठी वसुली करतात. आमचं ईडी, सीबीआय, आयटीवर नियंत्रण नाही. हा वसुलीचा पैसा राज्य सरकार पाडण्यासाठी वापरला जातोय असं राहुल गांधी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT