Rahul Gandhi statement on youth unemployment in India saam tv
देश विदेश

Rahul Gandhi: दर १,००० तरुणांपैकी केवळ १२ जणांना नोकरी; रोजगाराचे सर्व दरवाजे बंद; राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi Attacks Modi Government : प्रयागराजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी देशातील रोजगाराच्या परिस्थितीवर केंद्र सरकारवर निशाणा साधला. दर १,००० तरुणांपैकी केवळ १२ जणांना नोकरी मिळत असल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय.

Bharat Jadhav

  • राहुल गांधी यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला लक्ष्य केलं.

  • दर १,००० तरुणांपैकी केवळ १२ जणांना नोकरी मिळत असल्याचा दावा

  • भारतामधील रोजगाराचे पाच मार्ग केंद्र सरकारने बंद केलेत.

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. 'छात्रों की गूंज' (विद्यार्थ्यांचा आवाज) या कार्यक्रमाद्वारे त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. रोजगाराच्या मुद्द्यावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, भारतात रोजगाराचे पाच मार्ग होते आणि त्या सर्वांनाच सध्याच्या केंद्र सरकारने बंद केले आहेत. भारतात दर १,००० तरुणांपैकी केवळ १२ जणांना नोकरी मिळते. तुमचा डेटा काढून घेतला जातो आणि जिओ (Jio) व अदानी (Adani) सारख्या मोठ्या कंपन्यांना विकला जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय.

रोजगाराच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, भारतात रोजगाराचे पाच मार्ग होते आणि ते सर्व सध्याच्या केंद्र सरकारने बंद केलेत. विद्यार्थी अनेक वर्ष कठोर परिश्रम अभ्यास करतात आणि परीक्षांचे पेपर फुटत असतात. तरीही भीतीपोटी लोक त्याविरुद्ध आवाज उठवू शकत नसत. मात्र भारतातील तरुणांनी आपल्या भीतीवर मात केली आणि देशाला बदलून टाकले. तुम्ही आवाज उठवला ते द्वेषाने नाही, तर प्रेमाने, असं राहुल गांधी म्हणाले.

भारताची लोकसंख्या तरुण आहे आणि तरुणांकडेच सर्वाधिक 'डेटा' (माहिती) उपलब्ध आहे. तुमच्या डेटाशिवाय 'एआय' (AI) निरर्थक आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जाते, तरीही त्यातून मिळणाऱ्या प्रमाणपत्रांना कोणतेही मूल्य नाहीये, कारण ती तुम्हाला रोजगार मिळवून देऊ शकत नाहीत. भारतात ४० कोटी ऊर्जावान युवक आहेत. अमेरिका, चीन आणि रशिया सारख्या देश आपल्या युवा शक्तीचा मुकाबला करू शकत नाहीत.

सरकारवर हल्लाबोल करताना राहुल गांधी विद्यार्थ्यांशीही संवाद साधत. विद्यार्थ्यांना त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची विचारपूस केली. भरती प्रक्रिया आणि प्रश्नपत्रिका फुटण्याच्या (पेपर लीक) घटनांमुळे निर्माण झालेल्या समस्यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी त्यांना दिली. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, भारतातील दर १,००० तरुणांमागे केवळ १२ जणांच नोकरी मिळते.

तरुणांची माहिती (डेटा) हस्तगत करून ती जिओ आणि अदानी सारख्या बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना विकली जाते. ते म्हणाले की, देशातील प्रत्येक तरुण नागरिक ही भारताची ताकद आहे. जगातील सर्वाधिक डेटा भारताकडे आहे. प्रत्येक नागरिक ही भारताची ताकद आहे. जगातील सर्वाधिक डेटा भारताकडे असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

रोजगाराचे पाच मार्ग सरकारनं बंद केली

केंद्र सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, भारतात तरुणांच्या रोजगारासाठी पाच प्रमुख मार्ग होते. जे आता सर्वच्या सर्व बंद झालेत.

१) यातील पहिला मार्ग म्हणजे 'उत्पादन क्षेत्र' (मॅन्युफॅक्चरिंग). जगभरात 'मेड इन चायना' आणि 'मेड इन व्हिएतनाम' अशी उत्पादने पाहायला मिळतात, मात्र 'मेड इन इंडिया' उत्पादने कुठेही दिसत नाहीत. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उत्पादन क्षेत्राचा पूर्णपणे नाश झालाय.

२) दुसरा दरवाजा हा स्टार्टअप इंडियाचा होता. यात विद्यार्थ्यांना कर्ज, अर्थसाहाय्य दिलं जातं, परंतु तुम्हाला कोणतीच बँक एक रुपयाचं लोन देत नाही. बँका फक्त अंबानी, अडाणी सारख्या लोकांना कर्ज देतात.

३) इंटर्नशिप हा एक तिसरा मार्ग म्हणजेच सरकारी नोकऱ्यांचे प्रवेशद्वार होता आहे. मात्र, या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी तरुणांना प्रश्नपत्रिका फुटण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. यातून केवळ १५० पैकी एका उमेदवाराची निवड होते. म्हणजेच परीक्षा देणाऱ्या दर १५० तरुणांमागे केवळ एकालाच नोकरी मिळते.

४) ज्या सार्वजनिक क्षेत्राने एका दशकापूर्वी १४ लाख तरुणांना रोजगार दिला होता, त्याचे त्यानंतर खाजगीकरण करण्यात आलंय.

या सरकारच्या काळात सरकारी शाळा आणि रुग्णालये बंद करण्यात आली. बीएसएनएल (BSNL) विकले गेले. बंदरे, विमानतळ - सर्व काही अदानींच्या हवाली करण्यात आले. म्हणूनच सार्वजनिक क्षेत्र बंद पडले आहे.

५) पाचवा आणि शेवटचा मार्ग म्हणजे खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या. 'एआय'ने (AI) हा मार्गही पूर्णपणे बंद केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saree Colour Tips: साडीत दिसाल एकदम स्लिम अन् गॉर्जियस! बॉलिवूड अभिनेत्री फॉलो करतात हा सिक्रेट कलर फॉर्म्युला

8th Pay Commission : 3.83 किंवा 4.0 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास किती वाढेल पगार? जाणून घ्या गणित

BJP Leader: भाजप नेत्याच्या ताफ्यावर हल्ला, दगड-अंडी फेकल्याचा आरोप; राजकारणात खळबळ

Dalimb Fruit: डाळिंब आहे अत्यंत गुणकारी; शरीराला कोणते पाच फायदे मिळतात?

मध्यरात्री मोठा प्रशासकीय भूकंप; १४ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कोणत्या शहरात नियुक्ती?

SCROLL FOR NEXT