rahul gandhi  Saam tv
देश विदेश

एफआयआर करा किंवा विशेषाधिकार प्रस्ताव आणा, मी घाबरणार नाही; राहुल गांधी मोदी सरकारवर भडकले

rahul gandhi on narendra modi : एफआयआर करा किंवा विशेषाधिकार प्रस्ताव आणा. परंतु मी घाबरणार नाही, असं राहुल गांधींनी ठणकावून सांगितलं.

Vishal Gangurde

राहुल गांधींचा केंद्र सरकारवर शेतकरी प्रश्नांवरून हल्लाबोल केलाय

अमेरिकेसोबतच्या करारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असा दावा राहुल गांधींनी केला

एफआयआर करा किंवा विशेषाधिकार प्रस्ताव आणा’ असे आव्हान राहुल गांधींनी केलं

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्ही एफआयआर करा किंवा विशेषाधिकार प्रस्ताव आणा. मी शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी लढत राहील. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकारला ठणकावलं आहे. शेतकरी देशाचा पाया आहे असून भारताची अन्न सुरक्षा शेतकऱ्यांवर अवलंबून आहे, अशा शब्दात राहुल गांधींनी सरकारवर टीका केली.

'मोदी सरकारने अमेरिकेशी करार केला आहे. या करारामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. या करारामुळे कापूस, सोयाबीन, सफरचंद या फळ उत्पादक शेतकऱ्यांना उदारनिर्वाहापासून वंचित राहावे लागणार आहे. देशाची अन्न सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. मोदींनी केलेला करार हा शेतकरीविरोधी आहे,असेही त्यांनी म्हटलं आहे.

'गेल्या बऱ्याच काळापासून परदेशी शक्ती कृषी बाजारपेठेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यासाठी मोदी सरकारने दरवाजे उघडे केले आहेत. अमेरिकेतली शेतकऱ्यांकडे हजारो एकर जमीन आणि सरकारी अनुदान मिळतं. तर भारतामधील शेतकरी कमी एकरावर शेती करतात. त्यात त्यांना किमान आधारभूत किंमत मिळत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

'नरेंद्र मोदी उद्योजकांना फायदा पोहोचवतात, असा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला. सरकारने आधी वादग्रस्त कृषी कायदे आणले होते. आता बड्या उद्योजकांना कृषी क्षेत्र खुलं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही संसदेत शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दे उचलत राहू. आमच्याविरोधात कोणतीही कारवाई झाली तर हरकत नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

'काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते शेतकऱ्यांसोबत उभे आहेत. आम्ही अन्याय सहन करणारन नाही. शेतकऱ्यांच्या समर्थनात आम्ही एक इंच देखील मागे हटणार नाही, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : इस्रायल- इराण युद्धाचा फटका, हॉटेलमधील जेवण आणि मद्यसेवन महागणार

Vastu Tips: नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी या ५ वास्तूच्या नियमांचं करा पालन; घरात सतत राहील सुख शांती

T20 world cup prize money: T20 वर्ल्ड कप विजेत्या टीमवर कोटींचा वर्षाव; उपविजेत्यालाही मिळणार मोठी रक्कम

Womens Day स्पेशल बायकोला द्या स्वस्तात मस्त गिफ्ट, वाढेल नात्यातलं प्रेम

Women's Day Gifts: वूमन्स डे निमित्त स्वतःला द्या हे ७ खास गिफ्ट्स; दिवस होईल अधिक स्पेशल

SCROLL FOR NEXT