Rahul Gandhi court verdict on October 26 2026 saam tv
देश विदेश

राहुल गांधी यांची मानहानी प्रकरणात निर्दोष मुक्तता; काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

Rahul Gandhi Acquitted In 2018 Defamation Case: उत्तर प्रदेशातील सुलतानपूरच्या विशेष MP-MLA न्यायालयाने मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांची निर्दोष मुक्तता केली. अमित शाह यांच्यावरील वक्तव्याशी संबंधित या प्रकरणातील निर्णयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील विशेष MP-MLA न्यायालयाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात मोठा दिलासा दिला आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषमुक्त ठरवत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्याशी हे प्रकरण संबंधित आहे. या वक्तव्याविरोधात भाजपच्या एका स्थानिक नेत्याने राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणाची सुनावणीसाठी राहुल गांधी स्वतः न्यायालयात उपस्थित होते. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते. न्यायालय परिसरासह आसपासच्या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष; पक्षाकडून 'सत्यमेव जयते'ची पोस्ट

राहुल गांधी यांना न्यायालयाने दोषमुक्त ठरवल्याची बातमी समोर येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांनी नाचून आणि गाणी गाऊन आनंद व्यक्त केला. दुसरीकडे काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर सत्यमेव जयते अशी पोस्ट करत या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.

या प्रकरणातील तक्रारदाराच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष MP-MLA न्यायालयाचे न्यायाधीश शुभम वर्मा यांनी १३ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाचा निकाल सुनावण्यासाठी २६ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती. त्यानुसार रायबरेलीचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सोमवारी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले होते. राहुल गांधी सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजता सुलतानपूर येथील MP-MLA न्यायालयात पोहोचले. त्यांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती.

भाजपचे नेते आणि जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंगळूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Health : सकाळी उठल्यावर तोंडाला कडू चव का येते? फक्त रात्रीचे जेवणच नाही, तर लपली आहेत 'ही' ५ कारणेही

Breast cancer: ग्रामीण भागातील महिलांनो, स्तनात होणारे बदल दुर्लक्षित करू नका! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Maharashtra News Live Update: वीजपंपाचा शॉक लागून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

November Travel : थंडी सुरू होण्याआधी करा ट्रिप प्लान, नोव्हेंबरमध्ये फिरण्यासाठी भारतातील ५ सुंदर ठिकाणं

Kalamkari Saree Designs For Women: महिलांसाठी कलमकारी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये

SCROLL FOR NEXT