Rahul Gandhi x
देश विदेश

Rahul Gandhi : जनता काँग्रेसच्या प्रश्नांची उत्तरे मागतंय, म्हणून निवडणूक आयोगानं...; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

Rahul Gandhi Election Commission of India : मतदारांच्या यादीत फेरफार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. आरोपांमुळे निवडणूक आयोगाने मला शपथ घेण्यास सांगितल्याचे ते म्हणाले आहेत.

Yash Shirke

  • राहुल गांधींनी मतदार यादीत फेरफार झाल्याचा आरोप करून निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल केला.

  • काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी आयोगाने वेबसाइट बंद केल्याचा दावा; मात्र हा दावा चुकीचा ठरला.

  • हेराफेरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाईची मागणी; जबाबदारांना सोडणार नसल्याचे विधान.

  • संपूर्ण देशाची मतदार यादी व मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी; मोदींवर मतांची चोरी केल्याचा आरोप.

Rahul Gandhi News : मतदार यादीमध्ये फेरफार करण्यावरुन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. मी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने मला शपथ घेण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोग माझ्याकडे शपथपत्र मागत आहे. मी संसद भवनामध्ये संविधानावर शपथ घेतली आले. संविधानाच्या प्रतीवर हात ठेवून मी शपथ घेतली आहे, असे वक्तव्य बंगळुरूच्या काँग्रेसच्या रॅलीमध्ये राहुल गांधी म्हणाले.

जनता काँग्रेसच्या प्रश्नांची उत्तर मागत असल्याने निवडणूक आयोगाने त्यांची वेबसाईट बंद केली आहे, असा आरोप देखील गांधी यांनी केला आहे. भारतातील जनता डेटाबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहे, तेव्हा आयोगाने त्यांची वेबसाईट बंद केली आहे. मध्यप्रदेश, बिहारमध्ये वेबसाईट बंद केल्या आहेत. पण राहुल गांधीचा दावा चुकीचा ठरला आहे. दोन्ही ठिकाणी निवडणूक आयोगाची वेबसाईट नियमितपणे सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

'मतदार यादीत फेरफार करणाऱ्या अधिकाऱ्यांना कधीतरी पकडले जाईलच. कर्नाटक सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी आणि जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. संविधानात प्रत्येक नागरिकाला एक मत देण्याचा अधिकार असल्याचे नमूद आहे. या अधिकारावर निवडणूक आयोग आणि त्यांचे अधिकारी हल्ला करत आहेत. या अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. वेळ लागेल पण आम्ही त्यांना नक्की पकडू', असे राहुल गांधी म्हणाले.

देशाच्या संविधानाची प्रत दाखवत राहुल गांधी म्हणाले, 'निवडणूक आयोगाने संपूर्ण देशाची मतदार यादी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करुन द्यावी आणि सीसीटीव्ही फुटेज द्यावे. जर आम्हाला हा डेटा मिळाला तर फक्त कर्नाटकमध्येच नाही, तर संपूर्ण भारतात मतांची चोरी झाली आहे. हे आम्ही सिद्ध करु. पंतप्रधान मते चोरुन या पदापर्यंत पोहोचले आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: एकेकाळी आत्महत्या करण्याचा विचार ते IPS अधिकारी; अमित लोढा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; ५ राशींचे लोक संधीचं सोनं करणार, वाचा

Shocking : बापरे! ९८ टक्के भरलेल्या धरणावर कारचालकाची स्टंटबाजी; व्हिडिओ पाहून फुटेल घाम, VIDEO

Relationship Dispute : लग्नाचं आश्वासन देऊन ठेवलेले शारीरिक संबंध दुष्कर्म ठरत नाहीत : कोर्ट

Viral Video : अभिनेत्याचं स्टेजवर अभिनेत्रीशी गैरवर्तन, थेट कमरेत घातला हात; सोशल मीडियावर होतंय ट्रोलिंग

SCROLL FOR NEXT