हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटना : मृतांचा खच पाहून आला हृदय विकाराचा झटका, ऑन ड्युटी शिपायाचा जागीच मृत्यू
UP Hathras Stampede Saam tv
देश विदेश

UP Hathras Stampede : मृतांचा खच पाहून आला हृदय विकाराचा झटका, ऑन ड्युटी पोलीस शिपायाचा जागीच मृत्यू

Vishal Gangurde

हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये भोले बाबाच्या सत्संगमधील चेंगराचेंगरीत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर घटनास्थळी मृतांचा खच पडला होता. हे धक्कादायक दृश्य पाहून जलद प्रतिसाद पथकातील शिपायाचा हृदय विकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. त्यानंतर या शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हाथरसमधील जलद प्रतिसाद पथकातील शिपाई रवी यादव हे घटनास्थळावरील मृतदेहाची व्यवस्था करत होते. एकापेक्षा अधिक मृतदेह पाहून त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. रवी यादव यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर हाथरस जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य लोकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. घटनास्थळी प्रशासनाकडून मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मुख्यमंत्री योगी घटनास्थळी भेट देणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पाहणी करण्यासाठी बुधवारी हाथरसला जाणार आहे. मुख्यमंत्री योगी मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हा प्रशाननातील अधिकाऱ्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच घटनास्थळावरील लोकांना तातडीने मदत करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या चेंगराचेंगरी नेमकी का घडली, याचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत.

घटनास्थळावरील लोकांकडून मृतदेह कोणी दुचाकी, रिक्षातून रुग्णालयात नेत आहेत. घटनास्थळावरून धक्कादायक दृश्य समोर येत आहे. हजारो लोक भोले बाबाच्या सत्संगाला आले होते.

नेमकं काय घडलं?

भोले बाबाच्या सत्संगाला एका लाखांहून अधिक भक्त बसने आले होते. संत्सगाचा कार्यक्रम झाल्यानंतर भक्त एकापाठोपाठ चिखलात पडले. या लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी घटनास्थळी कोणी नव्हतं. हाथरसमध्ये हा कार्यक्रम १३ वर्षांनी झाला आहे. या कार्यक्रमाला ३ तासांची परवानगी होती. ही घटना दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ZIM: मुकेश कुमार आणि आवेश खानच्या भेदक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वे ढेर; १०० धावांनी टीम इंडियाचा विजय

Marathi Live News Updates : इंदापूर तालुक्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं जंगी स्वागत

Chhatrapati Sambhajinagar : भरधाव कारने दुचाकीला उडवलं; पती पत्नीचा जागीच मृत्यू, कारचालक फरार

Kalyan News: नदीवर फूले टाकण्यासाठी गेली अन् पडली; पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध महिलेला मिळालं जीवनदान

Manoj Jarange Video : चंद्रकांत पाटलांनी सरकारची सुपारी घेऊ नये, ओबीसीतून आरक्षण घेणारच; परभणीत मनोज जरांगे कडाडले

SCROLL FOR NEXT