Charles, Prince of Wales Saam TV
देश विदेश

Queen Elizabeth II Death : क्वीन एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटनच्या राजगादीवर कोण बसणार?

प्रिंस चार्ल्स यांना राजा घोषित करण्यात आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Charles, Prince of Wales : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शाही राजघराण्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राणी एलिझाबेथ यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले. राणी एलिझाबेथ या सर्वाधिक काळ ब्रिटनच्या सिंहासनावर बसल्या. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर तात्काळ प्रिंस चार्ल्स यांना राजा घोषित करण्यात आलं आहे. (How Old Is Queen Elizabeth)

कोण आहेत प्रिंस चार्ल्स?

प्रिन्स चार्ल्स हे राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांचे पुत्र आहेत. प्रिन्स चार्ल्स हे सगळ्यात मोठे असल्यामुळे त्यांना सिंहासनावर बसण्यात आलं आहे. त्यामुळे प्रिन्स चार्ल्स यांना किंग चार्ल्स तिसरे म्हणून संबोधलं जाईल. प्रिन्स चार्ल्स हे सध्या ७३ वर्षांचे आहेत.

ब्रिटनचा राजा होण्यासाठी प्रिन्स चार्ल्स यांना सर्वाधिक काळ वाट पाहावी लागली. प्रिन्स चार्ल्स यांची आई एलिझाबेथ या वयाच्या २५ व्या वर्षीच महाराणी झाल्या होत्या. प्रिन्स चार्ल्स राजा झाल्यानंतर आता ते ब्रिटनच्या इतिहासातले सगळ्यात वयस्कर सम्राट असतील. (Queen Elizabeth ii Grandchildren)

दरम्यान, प्रिन्स चार्ल्स राजा झाले तरी त्यांच्या पत्नी कॅमिला राणी ह्या राणी होणार की नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. कारण, प्रिन्सेस डायना यांच्या मृत्यूनंतर प्रिन्स चार्ल्स यांनी कॅमिला यांच्याशी विवाह केल्यामुळे ब्रिटनच्या नागरिकांमध्ये संशय आणि नाराजी होती.

या नाराजीबाबत एलिझाबेथ यांनी आपली भूमिका जाहीर केली होती. कॅमिला राणी होणार नाहीत, असं एलिझाबेथ यांनी सांगितलं होतं. प्रिन्स चार्ल्स जेव्हा राजा होतील तेव्हा कॅमिला यांना राणी व्हायचा मान मिळणार नाही, तर त्या फक्त क्वीन कनसॉर्ट म्हणजेच त्यांना फक्त राजाच्या पत्नीचा मान मिळेल, असं क्वीन एलिझाबेथ यांनी जाहीर केलं होतं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

SCROLL FOR NEXT