कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या आठ भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. आठही भारतीयांच्या सुटकेबद्दल भारत सरकारने आनंद व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
८ पैकी ७ भारतीय भारतात परतले आहेत. भारतीय नागरिकांच्या सुटकेची आणि घरी परतण्याची परवानगी देण्याच्या कतारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. भारताच्या राजनैयिक कुटनितीचा हा मोठा विजय असल्याचं म्हटलं जात आहे
आठ माजी नौसैनिक दोहा येथील अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीजमध्ये काम करत होते. त्यांना ऑगस्ट २०२२ मध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र, हे आरोप कधीच सार्वजनिक झाले नाहीत. या सर्वांवर पाणबुडी प्रकल्पाची हेरगिरी केल्याचा आरोप असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अल दहरा ग्लोबल कंपनी कतारच्या लष्करी दलांना आणि इतर सुरक्षा संस्थांना प्रशिक्षण आणि इतर सेवा पुरवते. एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात घालवल्यानंतर या माजी नौसैनिकांना ऑक्टोबरमध्ये कतारमधील कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या संदर्भात कतारने यापूर्वी कोणतीही माहिती न दिल्याने केंद्र सरकार चकित झाले होते. (Latest Marathi News)
भारताने या निर्णयाविरोधात अपील केले होते. कतार हा भारताला नैसर्गिक वायूचा मोठा पुरवठा करणारा देश आहे. सुमारे आठ लाख भारतीय तेथे काम करतात. दोन्ही देशांमध्ये नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत.
दुबईत COP-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्यात झालेल्या बैठकीच्या चार आठवड्यांच्या आत ही घोषणा करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.