8 IPS OFFICERS TRANSFERRED saam tv
देश विदेश

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

8 IPS Officers Transfer Latest News: पंजाब सरकारने पोलिस विभागात मोठा फेरबदल करत 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. अमृतसर, मानसा, पटीयाला, मोहाली आणि बठींडा येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

पंजाब सरकारने पोलिस विभागात मोठा फेरबदल करत 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये अमृतसर बॅार्डर रेंजच्या IG पासून विविध जिल्ह्यातील SSP दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या देखील बदलल्या आहेत. आदेशानुसार गुरप्रीत सिंह भूल्लर यांची अमृतसर बॉर्डर रेंजच्या आयजीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. ते हरमनबीर सिंह यांची जागा घेतील.

दरम्यान हरमनबीर सिंह यांच्याकडे अमृतसरच्या पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी ते अमृतसर बॉर्डर रेंजचे डीआयजी असताना अमृतसर पोलिस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळत होते.

मानसा आणि मीना यांची मानसा एसएसपी पदावरून बदली करून त्यांची एआयजी कर्मिक-1, सीपीओ पंजाब या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पटीयाला येथे एसपी मुख्यालय म्हणून कार्यरत असलेले वैभव चौधरी यांची मानसा एसएसपीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पटीयालाचे एसएसपी वरुण शर्मा यांची बदली करून त्यांना मोहालीचे एसएसपी करण्यात आले आहे. तर मोहालीचे एसएसपी हरमनदीप सिंह हंस आता पटीयालाचे एसएसपी म्हणून जबाबदारी स्वीकारतील. दोन्ही अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांची परस्पर अदलाबदल करण्यात आली आहे.

बठींडा एसएसपीचींही बदली

सुहल कासिर मीर जे आयजी कर्मिक-1, सीपीओ पंजाब या पदावर कार्यरत होते. यांची बठींडा एसएसपीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते ज्योती यादव यांची जागा घेतील. दरम्यान ज्योती यादव यांच्याकडे 82 व्या बटालियन पीएपी, चंदीगडच्या कामांडटपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंजाब पोलिस विभागातील या मोठ्या फेरबदलांमुळे विविध जिल्हे आणि पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल झाला आहे. या बदलामुंळे राज्यातील पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर महत्वाचे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पद मागितलं तर रिपोर्ट कार्ड काढेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नगरसेवकांना इशारा

Maharashtra Drought: राज्यात आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर, यादीत तुमचा तालुका आहे का? वाचा

आयटीआयमध्ये मिळणार पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार

Jaw reconstruction surgery: जबड्याच्या कॅन्सरची गाठ काढल्यानंतर चेहरा विद्रूप होण्याची भीती सोडा! आधुनिक शस्त्रक्रियेमुळे पुन्हा मिळेल चेहऱ्याचा मूळ आकार

Nail Cancer: नखांच्या कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं कोणती? वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT