Manjeet Kaur Death Case 
देश विदेश

७ आठवड्यांची गरोदर होती इन्फ्लुएन्सर; जिवंत जाळण्यापूर्वी घडलेला भयानक प्रकार समोर

Manjeet Kaur Death Case : पंजाबमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर यांचे अपहरण करून जंगलात झाडाला बांधून जाळण्यात आले. दोन महिन्यांच्या उपचारानंतर २६ ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम अहवालात त्या ७ आठवड्यांच्या गर्भवती असल्याचे समोर आले आहे.

Namdeo Kumbhar

Punjab Influencer Manjeet Kaur Death Case : पंजाबमधील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर (वय २८) यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनजीत कौर यांचे अपहरण करून त्यांना जंगलात एका झाडाला बांधून जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेनंतर तब्बल दोन महिने रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २६ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, समोर आलेल्या पोस्टमार्टम (Autopsy) अहवालानुसार मनजीत या ७ आठवड्यांच्या गरोदर होत्या. या खुलाशामुळे आरोपींनी एकाच वेळी दोन जीवांचा बळी घेतल्याचे उघड झाले आहे.

अपहरण करून जंगलात जाळले

मनजीत कौर यांच्या आई कांता देवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३ आणि ४ जुलैच्या मध्यरात्री मनजीत यांच्या ओळखीच्या शुभी आणि पिंडा यांनी त्यांना चंदीगडमधील सेक्टर ३४ येथे बोलावून घेतले. तेथे त्यांच्यावर हल्ला करून जबरदस्तीने गाडीत बसवले आणि मोरिंडा येथील जंगलात नेले. तेथे एका झाडाला बांधून त्यांना जाळण्यात आले. एका ओळखीच्या व्यक्तीने घटनास्थळी धाव घेत ब्लँकेटच्या साहाय्याने आग विझवली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जबाब नोंदवण्याआधीच प्राणज्योत मालवली

पीजीआयएमईआर (PGIMER) रुग्णालयात उपचारादरम्यान मनजीत यांना शुद्ध आली होती. त्यांनी पोलिसांना आपला अंतिम जबाब नोंदवण्याची विनंतीही केली होती. मात्र, पोलीस अधिकारी रुग्णालयात पोहोचेपर्यंत २६ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस तपासाला वेग

या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी शुभी आणि पिंडा यांच्याविरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येमागे प्रेमसंबंध, आर्थिक वाद की अन्य काही कारण आहे, या सर्व बाजूंनी पोलीस सध्या कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT