Punjab Elections Saam TV
देश विदेश

Punjab Elections: ‘भैय्या‘ टिप्पणीने मुख्यमंत्री चन्नी पुन्हा वादात

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी ‘भैय्या‘ शब्दावरून पुन्हा वादात सापडले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार व दिल्लीच्या लोकांना त्यांनी ‘भैय्या‘ संबोधल्याने भाजप व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चेन्नींवर टीका केली आहे

साम टिव्ही


नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी ‘भैय्या‘ शब्दावरून पुन्हा वादात सापडले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार व दिल्लीच्या लोकांना त्यांनी ‘भैय्या‘ संबोधल्याने भाजप व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चेन्नींवर टीका केली आहे. (Punjab CM in trouble due to Bhaiyya Word)

चेन्नी यांनी कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या उपस्थितीत हे वक्तव्य करून तिन्ही राज्यांच्या लोकांचा अपमान केला पण प्रियांका यांचेही यूपी बरोबर नाते आहे तेव्हा त्याही भैय्याच आहेत असा टोला केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी लगावला. केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष व कॉंग्रेस (Congress) यांच्यातच पंजाब विधानसभा निवडणुकीत खरी लढत असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

मुंबईमध्ये (Mumbai) उत्तर भारतीयांविरूध्द आंदोलन सुरू होते त्या काळापासून भैय्या हा शब्द प्रचलित झाला. विशएषतः यूपी व बिहारच्या लोकांच्या विरोधात हा शब्द अपमानास्पदरीत्या वापरला जातो. चेन्नी यांनी त्याचा वापर केल्याने भाजप व 'आप'ला काँग्रेसच्या विरोधात नवा मुद्दा मिळाला आहे. त्यातही चेन्नी जेव्हा भैय्या शब्द वापरतात तेव्हा प्रियांका गांधी हास्यमुखाने त्यांना दाद देतात असे व्हीडीओत दिसत असल्याने भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रियांका पंजाबमध्ये गेल्या होत्या. याच वेळी एका जाहीर सभेत त्यांच्याबरोबर उभे असलेले मुख्यमंत्री चेन्नी यांनी, ‘पंजाबी लोकांनी एक व्हावे व जे यूपी, बिहार व दिल्लीतून येथे येऊन राज्य करू पहातात त्या भैय्यांना यश मिळू देऊ नका,‘‘ असे म्हटले.

एका मुख्यमंत्र्यांनी वापरलेली ही भाषा अपमानास्पद आहे व ते बोलत असताना प्रियांका हसत आहेत. कॉंग्रेस याच पध्दतीने राज्याराज्यांच्या लोकांना एकमेकांशी लढवून यूपी व देशाचा विकास करणार आहे का? असाही सवाल मालवीय यांनी विचारला.

चेन्नी यांचे विधान अतिशय लज्जास्पद आहे असे सांगून केजरीवाल म्हणाले की, विशिष्ट व्यक्ती किंवा समुदायाबाबत अपमानास्पद टिप्पणी जाहीर सभेत करणे अत्यंत वाईट आहे. प्रियांका यांचा स्वतःचाही यूपीबरोबर घनिष्ठ संबंध आहे त्यामुळे त्याही ‘भैय्या‘च आहेत.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT