Punjab CM bhagwant singh mann hospitalised  Saam tv
देश विदेश

Punjab CM : मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली; फोर्टिस रुग्णालयात दाखल

Punjab CM bhagwant singh mann hospitalised : मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांची तब्येत बिघडली. त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांची तब्येत बिघडली

त्यांना फोर्टिस रुग्णालयात केलं दाखल

रुग्णालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना तातडीने मोहालीतील येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री भगवंत सिंग आज सकाळी संगरूर येथून परतल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. फोर्टिस रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संगरूर दौऱ्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांचा रक्तदाब अचानक वाढला. त्यामुळे त्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. परंतु सुधारणा न दिसल्याने त्यांना हेलिकॉप्टरने मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर विशेष डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

भगवंत मान हेलिकॉप्टरवरून चंढीगडला येत होते. त्याचदरम्यान हेलिकॉप्टरमध्ये त्यांची तब्येत बिघडली. त्यांना सुरुवातीला थोडी अस्वस्थता जाणवली. परंतु खबरदारी म्हणून त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने वैद्यकीय चाचण्या घेण्यास सुरुवात केली.

मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सर्व चाचण्या होत नाहीत. तोपर्यंत ते रुग्णालयात राहतील. त्यांना दुपारी ३ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयाबाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंजाब पोलीस डीजीपी गौरव यादव आणि मुख्य सचिव देखील रुग्णालयात आहेत. रुग्णालयाने अद्याप कोणतीही मेडिकल बुलेटिन जारी केलेली नाही. तसेच आम आदमी पक्षाकडूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही

तत्पूर्वी, मुख्यमंत्री भगवंत मान हे संगरुरच्या धुरी येथे श्री रंकेश्वर महादेव शिव मंदिर यांची पूजा केली. यावेळी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया उपस्थित होते. तिन्ही नेत्यांनी मंदिरात पूजा केली. या धार्मिक कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली. त्यांची तब्येत बिघडल्याने फाज्लिका दौरा देखील रद्द करण्यात आला आहे. तर त्यांची उद्या म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी मोगा येथे होणारी रॅली देखील रद्द करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT