Punjab Assembly Election Saam TV
देश विदेश

Punjab Assembly Election: काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर

पंजाब विधानसभा निवडणूक (Punjab Assembly Election) काही दिवसांवर येऊन ठेवली आहे.

वृत्तसंस्था

पंजाब: पंजाब विधानसभा निवडणूक (Punjab Assembly Election) काही दिवसांवर येऊन ठेवली आहे. पक्षांनी आपला प्रचार सुरु केला आहे. यातच आता पंजाबमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंजाब काँग्रेसने आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला आहे. राहुल गांधी यांनी लुधियानामध्ये आभासी रॅलीला संबोधीत करताना सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनाच पुढील मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषीत केले आहे. चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) हेच मुख्यमंत्री बनोत, त्यांच्यात अहंकार नाही. जनतेमध्ये जाऊन काम करतात असे राहुल गांधी म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

नरेंद्र मोदींना (Narendra Modi) तुम्ही कधी जनतेमध्ये जाऊन काम केलेले पाहिले आहे का? रस्त्यावर कधी कोणाची मदत करताना पाहिले आहे का? नाही करणार ते कारण ते पंतप्रधान नाही तर राजा आहेत अशी खोचक टीका राहुल गांधींनी केली आहे. पंजाबला एका अशा व्यक्तीची गरज आहे, जो पंजाबच्या नागरिकांना समजेल त्यांची गरीबी समजेल. नागरिकांना गरीब घरातील मुख्यमंत्री पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडणं हे अवघड होते. परंतु पजाबच्या लोकांनी आणि कार्यकर्तांनी त्याला सोपं बनवले.

त्याचवेळी नावाच्या घोषणेनंतर चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, सर्व काम तुमच्या कृपेने होत आहे. कन्हैयाच्या कृपेने माझे नाव होत आहे. मला हिम्मत हवी आहे, पैसा हवा आहे, मला पंजाबची जनता हवी आहे आणि माझ्यासोबत तुम्हा सर्वांची इच्छा आहे, तरच मी ही लढाई लढू शकेन, असे चन्नी म्हणाले. त्याचबरोबर चन्नी म्हणाले की, मी कधीही चुकीचे काम करणार नाही. चुकीचा पैसा घरी येऊ देणार नाही, फक्त पारदर्शकता राहील. मी पंजाबचे सोने करेल. नवज्योतसिंग सिद्धूचा मॉडेल सारखा पंजाब बनेल. सिद्धूसाहेबांना जे करायचे असेल ते ते करतील. जाखड साहेबांचे नेतृत्व पंजाबला पुढे घेऊन जाईल, मी यातला फक्त एक माध्यम आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haircare Tips: कमी वयात केस पांढरे झालेत? करा 'या' टिप्स फॉलो

Sanjay Raut: मुंब्रात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू, संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर!

Nachos Chaat At Home Recipe: घरच्याघरी बनवा हेल्दी नाचोस चाट; नोट करा सिंपल रेसिपी

Vargamantri: निवडणुकीच्या धामधूमीत आता "वर्गमंत्री" कोण होणार? ट्रेलर आला समोर

Parineeti Chopra: नवीन चित्रपटासाठी परिणीतीचा नवा लूक, केसांना कलर देत चाहत्यांना दिली बातमी

SCROLL FOR NEXT