काँग्रेसच्या बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांकडून धडाधड राजीनामे; शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली

Dhule Congress leaders join Shinde Sena: धुळ्याच्या साक्रित काँग्रेसला मोठं खिंडार. बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे.
eknath shinde
eknath shindex
Published On
Summary
  • धुळ्यात काँग्रेसला मोठं खिंडार.

  • बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांची शिंदेंच्या शिवसेनेत वाटचाल.

  • शिंदे गटाची ताकद वाढली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने उरले असताना धुळ्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसला खिंडार पडले असून, माजी सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर धुळ्यात शिंदे सेनेची ताकद वाढली आहे.

सध्या राज्यातील प्रत्येक नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. प्रत्येक नेत्यांनी रणशिंग फुंकले आहेत. अनेक तालुक्यांमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशातच धुळ्याच्या साक्रित काँग्रेसला खिंडार पडलं आहे.

eknath shinde
मुंबईतील 'या' नदीवर उभारणार नवा पूल; सायन, कुर्ला, BKC जाणाऱ्यांना फायदा

पश्चिम पट्ट्यातील काँग्रेसचे माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं. विकासकामांसाठी पक्षप्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या पक्षप्रवेशानंतर साक्रीत शिंदे सेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झालीये.

eknath shinde
ढिशूम -ढिशूम! २ तरूणांमध्ये मेट्रोत तुफान हाणामारी, कुणी नाक फोडलं, कुणी केस ओढले..VIDEO व्हायरल

तर, काँग्रेसच्या दिग्गजांनी पक्ष सोडल्याने पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. धुळ्यात काँग्रेसची ताकद कमी झाल्यामुळे पक्षातील मोठ्या नेत्यांना धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com