पीओकेमध्ये पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा ठार / Social media saam tv
देश विदेश

Hamza Burhan Killed: पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार; PoK मध्ये गोळीबारात केला खात्मा

Hamza Burhan Shot Dead in PoK : पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हमजा बुरहान याचा खात्मा करण्यात आला आहे. पीओकेच्या मुजफ्फराबाद येथे अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

Nandkumar Joshi

काश्मीरच्या पुलवामा येथे २०१९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहान याचा खात्मा करण्यात आला आहे. पीओकेच्या मुजफ्फराबाद येथे एका अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात तो जागीच ठार झाला. हमजा बुरहान हा २०१९ मधील पुलवामा हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक दहशतवादी होता. शिक्षक असल्याचे तो स्वतः सांगत होता. आपली ओळख लपवून तो पाकिस्तानमध्ये दडून बसला होता.

हमजा ठार झाल्यानं जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी गटाला एक जबरदस्त झटका आहे, असे मानले जात आहे. अरजुमंद गलजार डार उर्फ बुरहान हा अल बद्र या बंदी घातलेल्या संघटनेचा प्रमुख कमांडर होता. हमजा बुरहान हा जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा येथील रहिवासी होता. २०१७ मध्ये उच्च शिक्षणासाठी तो पाकिस्तानात गेला होता. त्यानंतर तो दहशतवादी संघटनेत स्थानिक तरूणांची भरती करणे, दहशतवादाचा निधी पुरवणे, घुसखोरांचे जाळे विणण्याचे काम करत होता.

१४ फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा हल्ला झाला होता. यात सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याच्या कटात त्याचा प्रमुख सहभाग होता. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने २०२२ मध्ये यूएपीए अंतर्गत त्याचा दहशतवादी यादीत समावेश केला होता. मंत्रालयाच्या माहितीनुसार, हमजा बुरहान पुलवामा आणि दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवणे, तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करून घेणे आणि दहशतवादी हल्ल्यांसाठी आर्थिक रसद पुरवण्याचे काम करत होता. आता हमजा मारला गेल्याने जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नेटवर्कला मोठा हादरा बसला आहे.

पहलगाम हल्ल्यात सहभाग

पुलवामा हल्ला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घडवून आणला होता. 'जैश'च्या दहशतवाद्यांनी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यात ४० हून अधिक जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच्या घटनेच्या चौकशीत हमजा बुरहान हा मुख्य सूत्रधारांपैकी एक असल्याचे समोर आले होते. पुलवामा हल्ल्याचा कट रचणे आणि आर्थिक रसद पुरवण्यात त्याचा हात असल्याचे एनआयएच्या चौकशीत स्पष्ट झाले होते. पुलवामासह काश्मीर खोऱ्यात पहलगाम आणि अन्य भागांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतही त्याचा हात असल्याचे चौकशीतून समोर आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईतून धक्कादायक बातमी! भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिकाने गमावला जीव; परिसरात हळहळ

Pune Fort : पुरंदरच्या शेजारी उभा आहे पराक्रम अन् शौर्याचा साक्षीदार, 'हा' ऐतिहासिक किल्ला पाहिलात का?

Monsoon Update : राज्यात हिट वेव्ह! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मान्सूनची प्रगती कुठपर्यंत? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Deool Band 2 Collection : आरं रं रं रं रं रं खतरनाक! मराठी चित्रपटांत 'देऊळ बंद २'चा डंका, प्रवीण तरडेंचा सिनेमा १०० कोटींपासून काही पावले दूर

Maharashtra Politics: 'सध्यातरी अर्थ खातं माझ्याकडे'; मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा 'अर्थ' काय?

SCROLL FOR NEXT