दिलासादायक बातमी! लवकरच डाळी आणि खाद्यतेल स्वस्त होणार Saam Tv
देश विदेश

दिलासादायक बातमी! लवकरच डाळी आणि खाद्यतेल स्वस्त होणार

भारताची ओळख एक कृषी निर्यातक देश म्हणून निर्माण

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी सोमवारी दिलेल्या माहितीवरून कोरोनाच्या Corona संकटकाळातही भारत पहिल्यांदाच कृषी निर्यातीत पहिल्या दहा देशांच्या यादीमध्ये आहे. आता भारताची ओळख एक कृषी निर्यातक देश म्हणून निर्माण होत आहे.

हे देखील पहा -

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा नववा हप्ता जारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला डाळी आणि खाद्यतेलाच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाद्यतेलात आत्मनिर्भरता आणण्यासाठी मिशन-ऑइल पाम मिशनची घोषणा केली आहे. यामध्ये ११ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीची घोषणा यावेळी करण्यात आली आहे. सरकार आणि शेतकरी यांच्या समन्वयामुळे देशातील अन्न भांडार भरलेले आहे असे यावेळी ते म्हणाले.

सुरुवातीच्या काळात डाळ आयात करावी लागत असे, मात्र आता या क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. गेल्या ६ वर्षात डाळीच्या उत्पादनात आता जवळपास ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. जे काम आपण डाळींसंदर्भात करुन दाखवले आता तेच काम खाद्यतेलांच्या उत्पादनाबाबतीत करायचा आहे असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT