Protests in Pakistan Against Imran Khan Release
Protests in Pakistan Against Imran Khan Release  Saam tv
देश विदेश

Protests in Pakistan : पाकिस्तानमध्ये परिस्थिती चिघळली! लोकांनी केला सर्वोच्च न्यायालयाचा घेराव, इम्रान खान यांच्या सुटकेविरोधात निदर्शने

Satish Kengar

Protests in Pakistan Against Imran Khan Release: पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लोक आकाराम झाले असून ते निदर्शने करत आहेत.

पाकिस्तानी सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या पीडीएम पक्षाचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत आणि इस्लामाबादमध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर इम्रान यांच्या सुटकेच्या विरोधात निदर्शने करत आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते.

पीडीएमचे कार्यकर्तेही मुख्य गेटवरून उडी मारून सर्वोच्च न्यायालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा व्हिडीओही समोर आला आहे. निदर्शनादरम्यान लोक इम्रान खानच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसले. पीडीएमचे म्हणणे आहे की, इम्रान खान यांच्या सुटकेचे आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाने कैद्यांना अनावश्यक सुविधा दिली आहे.  (Latest Marathi News)

पीडीएमने रविवारीच सर्वोच्च न्यायालयासमोर आंदोलन करण्याची घोषणा केली होती. यानंतर पीडीएम प्रमुख मौलाना फजल यांच्या शाहबाज शरीफ सरकारसोबत बैठकीच्या दोन फेऱ्याही झाल्या. पण आंदोलनाची जागा बदलण्यास सहमती झाली नाही. त्यानंतर आज पूर्वनिश्चित ठिकाणी निदर्शने सुरू झाले.

पीडीएमच्या कार्यकर्त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये मोठ्या संख्येने पीडीएम कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन सर्वोच्च न्यायालयासमोर निदर्शने करताना दिसत आहेत. काही कार्यकर्ते सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य गेटला लटकून आत जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळलं; लवकरच गोड बातमी मिळणार, वाचा आजचे पंचांग

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

SCROLL FOR NEXT