Protesting wrestlers return from Haridwar  saam tv
देश विदेश

Wrestlers Protest: टिकैत यांच्या मध्यस्थीनंतर कुस्तीपटू गंगाकाठावरून माघारी परतले! सरकारला ५ दिवसांचा अल्टीमेटम

Wrestlers Protest News: शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी मध्यस्थी करून त्यांची समजूत काढली आणि कुस्तीपटूंकडे ५ दिवसांची मुदत मागितली.

Chandrakant Jagtap

Wrestlers Protest Latest Update: भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कारवाईसाठी आक्रमक झालेले गोल्ड मेडल विजेते कुस्तीपटू आज हरिद्वार येथे गंगेमध्ये मेडल विसर्जित करणार होते. परंतु शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी मध्यस्थी करून त्यांची समजूत काढली आणि कुस्तीपटूंकडे ५ दिवसांची मुदत मागितली. यानंतर कुस्तीपटूं गंगाकाठाहून माघारी परतले आहेत.

भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंसोबत लैंगिक छळा केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात कारवाईसाठी गोल्ड मेडल विजिते नॅशनल हिरो जवळपास महिनाभरापासून दिल्लीत आंदोलन करत आहेत.

रविवारी दिल्लीत या कुस्तीपटूंना संसद भवन परिसरात जाण्यापासून पोलिसांनी रोखले होते. त्यानंतर आज कुस्तीपटूंनी टोकाची भूमिका घेतली आणि हरिद्वार येथे गंगेत सर्व मेडल विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. परंतु शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी हरिद्वार येथे जाऊन कुस्तीपटूंची समजूत काढली आणि त्यांच्याकडे ५ दिवसांचा वेळ मागितला.

क्रीडा मंत्रालयाने निवेदन जारी

भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात धरणे धरणारे कुस्तीपटू 28 मे रोजी नवीन संसद भवनाकडे कूच करत असताना त्यांना वाटेत पोलिसांनी अडवले आणि अनेक पैलवानांना ताब्यात घेतले. यानंतर विरोध करणाऱ्या अव्वल कुस्तीपटूंनी आपली पदके हरिद्वारच्या गंगा नदीत फेकण्याचा निर्णय घेतला आहे. कुस्तीपटूंच्या या घोषणेनंतर क्रीडा मंत्रालयाने एक निवेदन जारी केले असून हे पदक केवळ खेळाडूंचे नसून ते संपूर्ण देशाचे आहे आणि कुस्तीपटूंची जी काही तक्रार असेल त्याची चौकशी सुरू आहे असे म्हटले आहे.

कुस्तीपटूंची टोकाची भूमिका

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या निषेधार्थ खेळाडूंनी आपली पदके गंगेत वाहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कुस्तीपटूंनी ट्विटही केले आहे. हे पदक देशासाठी पवित्र आहे त्यामुळे ते पवित्र गंगेतच टाकावे असे त्यांनी म्हटले आहे. साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे पदक गंगेत फेकण्यासाठी हरिद्वारला पोहोचले. पंरतु टिकैत यांनी मध्यस्थी केल्यानंतर आता कुस्तीपटू गंगाकाठाहून माघारी परतले आहेत. (Latest Political News)

इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीसाठी दिल्लीतील इंडिया गेटवर कुस्तीपटू आमरण उपोषणाला बसणार आहेत. मात्र दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना इंडिया गेटसमोर उपोषणासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही असे सांगितले जात आहे. या अंदोलनात कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ काँग्रेस नेते आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने तेथे उपस्थित आहेत. देशातील आघाडीचे कुस्तीपटू 23 मेपासून भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निदर्शने करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

SCROLL FOR NEXT