Amravati News: अमरावती शहरातील ८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता! महाराष्ट्र मंदिर महासंघाचा निर्णय

2 महिन्यात अमरावती जिल्ह्यातील आणखी 25 मंदिरात वस्त्र संहिता लागु होईल, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाने दिली आहे.
Amravati News
Amravati NewsSaamtv

अमर घटारे, प्रतिनिधी...

Dress Code In Amravati Temple: काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने नागपुरातील चार मंदिरात वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. मंदिरातील पावित्र्य जपण्यासाठी ही वस्त्र संहिता लागू केल्याचं महासंघाच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानंतर आता अमरावती शहर व जिल्ह्यातील आठ मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Amravati News
Nashik News: नाशिकच्या सप्तश्रृंगी मंदिरातही ड्रेस कोड लागू होणार? मंदिर समिती विश्वस्तांची माहिती

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरनंतर अमरावतीमधील श्री अंबादेवी मंदिरासह शहर व जिल्ह्यातील आठ मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्र संहिता(ड्रेस कोट) लागु करण्यात येणार आहे. उद्यापासून हा नियम लागू होणार असून येत्या 2 महिन्यात अमरावती जिल्ह्यातील आणखी 25 मंदिरात वस्त्र संहिता लागु होईल, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाने दिली आहे.

अमरावती शहरातील श्री अंबादेवी संस्थान, बालाजी मंदिर, पिंगळादेवी संस्थान ,लक्ष्मीनारायण देवस्थान, शैतुतबाग हनुमान मंदिर, दुर्गा माता मंदिर,वैष्णोधाम मंदिरात या मंदिरांमध्ये हा ड्रेस कोड लागू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शहरातील सर्व मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

Amravati News
10-Year-Old-Girl-Molested In Maharashtra : दहा वर्षाच्या मुलीवर तिघांचा सामुहिक अत्याचार

दरम्यान, या आधी नागपूरमध्ये (Nagpur) सर्वप्रथम याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. नागपूरातील गोपाळ कृष्ण मंदिर, धनतोली, संकटमोचन पंचमुख हनुमान मंदिर, बेलोरी, बृहस्पती मंदिर, कोन्होलीबारा आणि दुर्गामाता मंदिर हिलटॉप या मंदिरांमध्ये ड्रेसकोड बंदी करण्यात आली. ज्यानंतर लवकरच नाशिकच्या (Nashik) सप्तश्रृंगी मंदिरामध्येही हा नियम लागू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com