अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी saam tv
देश विदेश

राजकारणात खळबळ! माजी मुख्यमंत्र्यांना जोरदार झटका; माजी आमदारासह महत्वाच्या ३ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Priyanka Kakkar joins Congress after quitting AAP : आम आदमी पक्षाला काँग्रेसने जोरदार झटका दिला आहे. पक्षाच्या प्रवक्ता आणि पक्षाची बाजू भक्कमपणे माध्यमांसमोर मांडणाऱ्या नेत्या प्रियंका कक्कड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Nandkumar Joshi

अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबता थांबेना. आम आदमी पक्षाला मोठा झटका लागला आहे. राघव चड्ढा यांच्यासह अनेक नेत्यांनी बंडखोरी केल्यानंतर आता पक्षाची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या महिला नेत्यानं पक्षाला रामराम केला आहे. माध्यमांवर पक्षाची बाजू जोरकसपणे मांडणाऱ्या प्रियंका कक्कड यांनी आम आदमी पक्षाला रामराम करून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी शनिवारी काँग्रेसला हाथ दिला. कक्कड यांच्यासह रजत राकेश टंडन आणि माजी आमदार श्याम सुंदर शर्मा यांनीही पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.

पेशाने वकील असलेल्या प्रियंका कक्कड या आम आदमी पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या. माध्यमांवरील चर्चासत्रांमध्ये पक्षाची बाजू भक्कमपणे आणि अधिक आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. भाजपच्या प्रवक्त्यांसोबत त्यांच्या वादविवादांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. आता अचानक त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्ली काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र यादव, ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला आणि पवन खेरा यांच्या उपस्थितीत कक्कड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मला अभिमानास्पद वाटत आहे की मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. ज्या दिल्लीत मी मोठी झालीये ती दिल्ली मला पुन्हा हवीये. स्वच्छ, हिरवाई आणि विकसित तसेच सुरक्षित दिल्ली मला हवीये, त्या दिल्लीत मी लहानाची मोठी झालीये. ती दिल्ली पुन्हा मिळवून देण्याचे काम फक्त काँग्रेसच करू शकते असं मला वाटत आहे, अशी प्रतिक्रिया कक्कड यांनी पक्षप्रवेशानंतर दिली.

राहुल गांधी देशातील विश्वासू नेता

देशाच्या राजकारणात अधिक विश्वसनीय नेता कुणी असेल तर ते फक्त राहुल गांधी आहेत, असे मला वाटते. ते एकमेव नेते असे आहेत की त्यांनी कधीच अश्रू ढाळले नाहीत. त्यांना बदनाम करण्यासाठी यंत्रणा लावली गेली,पण राहुल गांधी आणि काँग्रेस हे ठाम राहिले, असेही त्या म्हणाल्या.

आम आदमी पक्ष सोडण्याचे कारण

प्रियंका कक्कड यांनी आम आदमी पक्ष सोडण्याचे कारणही यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी बंगला-चॉपरचा उल्लेख करत थेट पक्ष नेतृत्व म्हणजेच अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. मी बंगला गाडी काहीही घेणार नाही आणि त्यानंतर खासगी दौऱ्यांसाठीही हेलिकॉप्टरचा वापर करू लागले. मी त्याचा बचाव कधीच करू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी केजरीवालांवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडलं. आम आदमी पक्षाने बुद्धिमान लोकांना आकर्षिक केले होते. पण ते त्यांना कायम राखता आले नाही. ज्यांनी बूथ पातळीवरही कधी काम केले नाही, त्यांना पक्षात स्थान दिले जात आहे. काहींना राजस्थानमधून पंजाबमध्ये बोलावून मोठमोठी पदे, बंगला, गाड्या सगळं काही दिलं जात आहे. मी त्याचा बचाव करू शकत नाही, असे कक्कड म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honey and Garlic Benefits: मधासोबत लसूण खाण्याचे 5 जबरदस्त आरोग्यदायी फायदे; शरीर राहील निरोगी

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर ठाण्यात सर्वपक्षीय नेते एकवटले

Banana : केळी खाल्ल्यानंतर किती लिटर पाणी प्यावे? ९०% टक्के लोक करतात ही चूक, आताच घ्या जाणून

Petrol Price Hike : मोठी बातमी! पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महागले; 'या' पंपांवर वाढले दर

चारित्र्याच्या संशयावरून नराधम पतीची पत्नीला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, दोन मुलांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं

SCROLL FOR NEXT