प्रमोद जगताप, प्रतिनिधी
देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. देशातील दिग्गज नेते या निवडणुकांच्या मैदानात उतरले असून प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसत आहेत. त्यामुळे राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यामुळे कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि आपचे केजरीवाल यांना निवडणुक आयोगाने नोटीस पाठवली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळे निवडणुक आयोगाने कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भाजपच्या तक्रारीवरून त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आयोगाने प्रियांका गांधी यांना १६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.
काय म्हणाल्या होत्या प्रियांका गांधी?
मध्य प्रदेशातील एका सभेत पंतप्रधान मोदींवर (Pm Narendra Modi) टीका करताना प्रियांका गांधी यांनी "मोदीजी, हे BHEL होतं, ज्याने आम्हाला रोजगार दिला, ज्यामुळे देश प्रगती करत आहे. तुम्ही काय केले, कोणाला दिले, तुमच्या बड्या उद्योगपती मित्रांना दिले का? असा सवाल उपस्थित केला होता.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट शेअर केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने बुधवारी आम आदमी पक्षालाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांना गुरुवारपर्यंत सोशल मीडिया पोस्टमध्ये केलेल्या विधानांवर स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.