Priyanka Gandhi Vadra Hospitalized Saam tv
देश विदेश

Priyanka Gandhi Hospitalized: प्रियंका गांधी यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात करण्यात आलं दाखल

Priyanka Gandhi Health News: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Satish Kengar

Priyanka Gandhi Hospitalized:

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

आज त्या उत्तर प्रदेशातील चंदौली येथील भारत जोडो न्याय यात्रेला राहणार होत्या. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. याबाबत त्यांनी स्वतः ट्विटरवर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हणाल्या आहेत की, माझी तब्येत बारी झाल्यावर मी भारत भारत जोडो न्याय यात्रे सहभागी होणार. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रियांका गांधी यांनी ट्विट केले की, "भारत जोडो न्याय यात्रेची उत्तर प्रदेशात पोहोचण्याची मी आतुरतेने वाट पाहत होते. पण आजारपणामुळे मला आजच रुग्णालयात दाखल व्हावे लागले. मला बरे वाटल्यावर मी या यात्रेत सामील होईन. तोपर्यंत चंदौली-बनारसला पोहोचणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना आणि उत्तर प्रदेशातील प्रिय बंधू जे यात्रेत सहभागी होण्याची तयारी करत आहेत. त्यांना मी शुभेच्छा देते.'' (Latest Marathi News)

दरम्यान, भारत जोडो न्याय 16 फेब्रुवारीला वाराणसी मार्गे उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करेल आणि नंतर भदोही, प्रयागराज आणि प्रतापगड मार्गे 19 फेब्रुवारीला अमेठीला पोहोचेल. 19 फेब्रुवारी रोजी राहुल गांधी अमेठी लोकसभा मतदारसंघातील गौरीगंज येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. ही यात्रा दुसऱ्या दिवशी रायबरेलीला पोहोचेल तेथून ती लखनौला जाईल जिथे राहुल गांधी आणि इतर सहभागी रात्री मुक्काम करतील.

रायबरेली ही उत्तर प्रदेशातील एकमेव लोकसभेची जागा आहे, जी काँग्रेसकडे आहे. सध्या सोनिया गांधी या मतदारसंघातून लोकसभेच्या खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून अमेठीची जागा गमवावी लागली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT