दिल्ली विधानसभा निवडणुकाच्या प्रचार सभांनी तेथील राजकारणाचा पारा चढलाय. या तापललेल्या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार हल्लाबोल केलाय. जर नेहरू यांची सत्ता असती तर १२ लाख रुपयांवर एक चतुर्थांश कर द्यावं लागत होतं. तर इंदिरा गांधी यांची सत्ता असती तर १२ लाख रुपयांवर १० लाख रुपये कर रुपात सरकारला द्यावे लागले असते.
दहा ते १२ वर्षांपूर्वी जर तुम्ही काँग्रेस सरकारच्या काळात १२ लाख रुपये कमावले असते तर तुम्हाला २ लाख ६० हजार रुपये कर भरावा लागला असता. काँग्रेस सरकार आपली तिजोरी भरण्यासाठी कर आकारायची. पण भाजपच्या काळात तुम्हाला १२ लाख रुपयांच्या कमाईवर एकही रुपयाचा टॅक्सही लागणार नाहीये. शनिवारी सादर झालेला बजेट हा गरिबांसाठी होता, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.
दरम्यान बजेट करण्यात आलेल्या घोषणेचा फायदा तरुणांना होणार आहे. आज भारत भाजपसोबत आहे. ज्यांनी कोणी विचारत नाही त्यांची विचारपूस मोदी करतो. आप आणि काँग्रेसने जनतेला धोका दिलाय, असंही पंतप्रधान मोदी काँग्रेस आणि आपवर टीका करताना म्हणाले.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, हा मध्यमवर्गीयांसाठी सर्वात अनुकूल अर्थसंकल्प आहे. हे बजेट ऐकून भारतातील प्रत्येक व्यक्ती आनंदी आहे. १२ लाखांच्या कमाईवर शुन्य टॅक्स करण्यात आलाय, त्यामुळे मध्यमवर्गातील लोकांचे हजारो रुपये वाचतील. हा बजेट मध्यमवर्गीय लोकांच्या खिशात पैसा खेळता ठेवणारा आहे. दिल्लीतील मध्यमवर्गीयांच्या खिशात हजारो रुपये अतिरिक्त येतील. स्वातंत्र्यानंतर आयकरात इतका मोठा दिलासा मिळाला असल्याचंही मोदी म्हणालेत.
वसंत पंचमीसह हवामान बदलण्यास सुरुवात होत असते. ५ फेब्रुवारीपासून वसंत येणार असून दिल्लीत भाजप सरकार येईल. यावेळी सर्व दिल्लीकर अब की बार भाजप सरकार म्हणत आहे. यावेळी आम आदमी पार्टीवर टीका करताना मोदींनी आपला आपदा संबोधलंय. आप सरकारने ११ वर्ष खराब केली आहेत. तुम्ही मला सेवा करण्याची संधी द्या, तुमच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी मी सर्व पणाला लावेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.