PM Modi Meeting for UP Government Formation Saam Tv
देश विदेश

Narendra Modi: यूपी सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वपूर्ण बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवी दिल्लीमध्ये लोककल्याण मार्गावर त्यांच्या अधिकृत निवासस्थानी उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमधील सरकार स्थापनेविषयी बैठक घेतली

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी नवी दिल्लीमध्ये लोककल्याण मार्गावर त्यांच्या अधिकृत निवासस्थानी उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमधील सरकार स्थापनेविषयी बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे देखील पहा-

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) २५ मार्च दिवशी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, त्यांच्या मंत्रीमंडळामध्ये कोणाचा समावेश होणार याविषयी कोणती देखील बातमी आली नाही. भाजप आता मंत्रीमंडळ आणि मंत्रीमंडळाच्या यादीमध्ये शेवटच्या क्षणी बदल करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. उत्तर प्रदेशच्या नवनिर्वाचित भाजप सरकारचा शपथविधी सोहळा २५ मार्च दिवशी दुपारी ४ वाजता होणार आहे.

याअगोदर, कदाचित २१ मार्च रोजी काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाणार आहे. योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. योगींच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. उत्तराखंडमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवके आहे.

मात्र, येथील मुख्यमंत्री धामी यांना खटिमा येथून हार स्वीकारावी लागली आहे. तरी देखील त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, चौबट्टाखालचे आमदार सतपाल महाराज, श्रीनगरचे धन सिंह रावत आणि राज्यसभा सदस्य अनिल बलूनी अशी काही इतर नावे दावेदारांमध्ये आहेत, असे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar : गणपती विसर्जनानंतर अक्षय कुमार पोहचला जुहू बीचवर; हातात ग्लोव्हज घालून उचलला कचरा, पाहा VIDEO

बॉलिवूड अभिनेत्रीचा कारनामा! निर्मात्याला डांबून ठेवलं, बंदुकीचा धाक दाखवून १० लाख रूपये उकळले, सिनेसृष्टीत खळबळ

Maharashtra Live News Update: धारूर तालुक्याच्या वतीने भोगलवाडी येथे महा एल्गार सभा

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय! १०० कोटींची इमारत खरेदी करणार

Nashik Tourism: हिरवागार निसर्ग आणि थंडगार वारा! नाशिकवरुन फक्त २५ किलोमीटरवर असलेल्या 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT