Crime News Saam TV
देश विदेश

Saryu Express Incident : महिला कॉन्स्टेबलवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीचा एन्काऊंटर, दोघांना अटक

Crime News : पुरा कलदनारचे पोलीस अधिकारी देखील क्रॉस फायरिंगमध्ये जखमी झाले आहेत.

प्रविण वाकचौरे

Uttar Pradesh News :

उत्तर प्रदेशमध्ये सरयू एक्स्प्रेसमधील महिला कॉन्स्टेबलवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी पोलीस चकमकीत ठार झाला आहे. तर त्याच्या इतर दोन साथीदारांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पुरा कलंदर पोलीस स्टेशन परिसरात पोलीस आणि अनीस यांच्यात चकमक झाली.

पुरा कलदनारचे पोलीस अधिकारी देखील क्रॉस फायरिंगमध्ये जखमी झाले आहेत. तीन आरोपींनी सरयू एक्स्प्रेसमध्ये एका महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग केला होता, तिने विरोध केला असता त्यांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी पोलीस चकमकीत ठार झाला आहे. तर त्याच्या आणखी दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. या दोघांना अयोध्येतील इनायतनगर येथून चकमकीनंतर अटक करण्यात आली.  (Latest Marathi News)

घटनेच्या दिवशी अनीसने महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी महिला कॉन्स्टेबलने गुन्हेगाराला विरोध करत खाली पाडले. तेव्हा अनीस आणि त्याच्या साथीदारांनी महिला कॉन्स्टेबलवर जीवघेणा हल्ला केला.

महिला कॉन्स्टेबलचे डोके रेल्वेच्या खिडकीवर आपटून जखमी केले होते. अयोध्येपूर्वी ट्रेनचा वेग कमी झाल्यावर तिन्ही बदमाशांनी ट्रेनमधून उडी मारून पलायन केले. तेव्हापासून पोलीस तिन्ही आरोपींचा शोध घेत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayush Komkar Funeral : माझी चूक नसतानाही मुलाची हत्या; मुलाला अग्नी देताना गणेश कोमकर ढसाढसा रडला

Dark Circles Symptoms: डोळ्यांखाली डार्क सर्कल कोणत्या कमतरतेमुळे येतात? ही आहेत लक्षणे आणि उपाय

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील त्यांच्या राहत्या घरी पोहोचले

Bengali white saree: दुर्गापूजेला बंगाली महिला लाल बॉर्डर असलेली पांढरी साडी का नेसतात? जाणून घ्या खरं कारणं

Maratha Reservation: मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री,कोल्हापूर गॅझेटीयरमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT