Edible oil Saam TV
देश विदेश

आभाळाएवढ्या महागाईत दिलाशाचा शिडकावा; खाद्यतेल लवकरच होणार स्वस्त

देशातील पाम तेलासह इतर खाद्यतेलांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : किरकोळ आणि घाऊक किंमत निर्देशांकानं उच्चांकी गाठली असून, वाढत्या महागाईनं (Inflation) सर्वसामान्यांची होरपळ सुरू असतानाच, काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पाम तेलासह खाद्यतेलाच्या किंमती (Edible Oil) कमी होण्याची शक्यता आहे. जगात सर्वाधिक पामतेलाचं उत्पादन घेणाऱ्या इंडोनेशियानं पामतेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातील पाम तेलासह इतर खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इंडोनेशियाने (Indonesia) २३ मे पासून पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी गुरुवारी ही घोषणा केली आहे. इंडोनेशियाच्या खासदारांनी सरकारला तेलावरील निर्यात बंदीचा आढावा घेण्याचं आवाहन केलं होतं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

एका वृत्तसंस्थेने सांगितल्यानुसार खासदारांनी सरकारला आवाहन केलं की, पाम तेलाचा उद्योग करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, जर पाम तेलावरची बंदी लवकर उठवली नाही तर देशातील पाम तेलाचे उत्पादन ठप्प होऊ शकतं. तसंच देशात आता पामतेल साठवण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे आता निर्यातबंदीचा फेरविचार करावा असं खासदारांनी सांगितलं आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा पाम तेल उत्पादन करणारा देश आहे. गेल्या महिन्यात २८ एप्रिल रोजी, इंडोनेशियाने देशातील वाढत्या किमती रोखण्यासाठी कच्चा पाम तेलासह त्यातील काही उत्पादनांवर निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, इंडोनेशियातून पामतेलाची निर्यात सुरू झाल्यानंतर आता खाद्यतेलाच्या किमती पुन्हा एकदा खाली येण्याची शक्यता आहे. इंडोनेशियामध्ये ६० लाख टन पामतेल साठवण्याची क्षमता असून मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत देशात ५.८० लाख टन पामतेल जमा झाले होते. इंडोनेशियाच्या एकूण पामतेल उत्पादनापैकी केवळ ३५ टक्के उत्पादन इंडोनेशियाच्या देशांतर्गत बाजारपेठेत वापरलं जातं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HAL Recruitment: हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ६०,००० रुपये पगार; अशा पद्धतीने करा अर्ज

Vaibhav-Irina : देखो ना खुद को जरा... इरिना-वैभवचा जिममध्ये रोमँटिक डान्स; चाहते म्हणाले, 'फॉरेनची पाटलीण'

New Family Pension Rule: आई- बाबांची पेन्शन मुलांना मिळते का? लग्न झालेल्या मुलीचा अधिकार किती?

Maharashtra News Live Updates :शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार

Maharashtra Politics: माझी भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी? धनंजय मुंडेचा थेट शरद पवारांना इशारा

SCROLL FOR NEXT