Rahul Gandhi On New Parliament building SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi On New Parliament building: संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन पंतप्रधानांनी नाही, तर राष्ट्रपतींनी केले पाहिजे : राहुल गांधी

संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन पंतप्रधानांनी नाही, तर राष्ट्रपतींनी केले पाहिजे : राहुल गांधी

Satish Kengar

Rahul Gandhi On New Parliament Building: देशाला या महिन्याच्या अखेरीस नव्या संसदेची भेट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. आता याच मुद्द्यावरवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, पंतप्रधानांनी नाही, असं ते म्हणाले आहेत.

लोकसभा सचिवालयाने सांगितले होते की, नव्याने बांधलेल्या संसदेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीत बिर्ला यांनी पंतप्रधानांना त्याचे उद्घाटन करण्याचा आग्रह केला.

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सोशल मीडियावर केलेल्या आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, पंतप्रधानांनी नाही.’ (Latest Marathi News)

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी २८ मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. याच दिवशी स्वतानंतरविर वि.दा. सावरकर यांची जयंती आहे. त्यामुळे अनेक विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तर काँग्रेसने हा राष्ट्रनिर्मात्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

लोकसभा सचिवालयाने संसद भवनावर तयार केलेल्या पुस्तिकेनुसार, नवीन संसद भवनाच्या लोकसभेच्या चेंबरमध्ये ८८८ सदस्यांसाठी बसण्याची व्यवस्था असेल आणि ३८४ सदस्य राज्यसभेत बसू शकतील. तसेच संयुक्त अधिवेशनादरम्यान सभागृहात १,२७२ सदस्यांसाठी बसण्याची व्यवस्था असेल. पंतप्रधान मोदी यांनी १० डिसेंबर २०२० रोजी संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT