President Droupadi Murmu appoints governors for six states in October 2026 saam tv
देश विदेश

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

President Announces Governor Appointments For Six States: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळ, तामिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीम या सहा राज्यांसाठी राज्यपालांची नियुक्ती केली आहे. कोणत्या राज्यात कोणाची नियुक्ती झाली? हे जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहा राज्यांचे राज्यपाल बदलले

  • केरळचे नवे राज्यपाल म्हणून ओम प्रकाश माथूर यांची नियुक्ती

  • राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती

देशभरात निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनांनी वातावरण तापलंय. त्यादरम्यान एक मोठी राजकीय घडामोड घडलीय. देशातील सहा राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आलेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहा राज्यांसाठी राज्यपालांची नियुक्ती केलीय. यामध्ये ओम प्रकाश माथूर यांची केरळचे राज्यपाल म्हणून, तर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. ओडिशाचे राज्यपाल म्हणून ब्रज मोहन राम, कर्नाटकचे डॉ. सुधा यादव, उत्तराखंडचे डॉ. धलसिंग बिसेन आणि सिक्कीमचे दुष्यंत गौतम यांची नियुक्ती करण्यात आलीय.

सिक्कीमचे नवीन राज्यपाल कोण?

दुष्यंत गौतम हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून ते पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय कामकाजात सक्रिय राहिलेत. त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर सिक्कीम भाजपने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या. सिक्कीम भाजपचे अध्यक्ष डी. आर. थापा यांनी सोमवारी सायंकाळी लोक भवन येथे जाऊन नवनियुक्त राज्यपालांची भेट घेतली होती.

दुष्यंत गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील शांतता, प्रगती आणि विकासाला अधिक गती मिळेल, अशी आशा सिक्कीम भाजपने व्यक्त केलीय. राज्यपाल म्हणून त्यांचा कार्यकाळ सिक्कीमचा विकास आणि लोकांच्या आकांक्षांना पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही पक्षाकडून वर्तवण्यात आलाय.

दरम्यान, भाजपच्या सिक्कीम शाखेने ओम प्रकाश माथूर यांनी आपल्या कार्यकाळात दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि सेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वाचे आणि राज्याच्या जनतेच्या कल्याणाप्रती असलेल्या निष्ठेचे कौतुक करताना पक्षाने म्हटलं की, सिक्कीमसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण ठेवली जाईल. भाजप सिक्कीमच्या माध्यम कक्षाने जारी केलेल्या निवेदनात, दोन्ही नेत्यांना त्यांच्या नवीन जबाबदाऱ्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पक्षाने ओम प्रकाश माथूर यांना केरळचे राज्यपाल म्हणून त्यांच्या नवीन कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

SCROLL FOR NEXT