लखीमपूर हिंसाचाराबाबत अहवाल द्या; कोर्टाचे योगी सरकारला आदेश Saam Tv
देश विदेश

लखीमपूर हिंसाचाराबाबत अहवाल द्या; कोर्टाचे योगी सरकारला आदेश

या प्रकरणाचे शीर्षक 'लखीमपूर खेरीतील हिंसाचारामुळे जीवित हानी' आहे.

विहंग ठाकूर

विहंग ठाकूर

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने लखीमपूर खेरी हिंसाचाराची स्वतःहून दखल घेतली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी हिंसाचारावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती. हिंसाचारानंतर नोंदवलेल्या गुन्ह्याच्या अंतर्गत आता सुनावणी झाली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण आणि न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचे खंडपीठ आज या प्रकरणाची सुनावणी केली आहे.

हे देखील पहा-

सुनावणी झालेल्या, या प्रकरणाचे शीर्षक 'लखीमपूर खेरीतील हिंसाचारामुळे जीवित हानी' आहे. रविवारी येथे झालेल्या हिंसाचारात 4 शेतकऱ्यांसह 8 जण ठार झाले. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने त्यांना वाहनासह चिरडून ठार केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे, तर मंत्री आणि त्यांचा मुलगा घटनास्थळी उपस्थित नसल्याचा दावा करत आहेत.

लखीमपूर खेरी मृत्यू प्रकरण सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला आरोपी कोण आहेत, कोणा विरोधात एफआयआर नोंदवला आहे आणि अटक केलेल्यांचा अहवाल सादर करण्यास कोर्टाने आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने यूपी सरकारला लखीमपूर खीर हिंसाचार चौकशीबाबत स्टेटस रिपोर्ट उद्या दाखल करण्यास सांगितल आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर उत्तर प्रदेशमध्ये वातावरण तापलं होत. राहूल गांधी, प्रियंका गांधी यांनाही पीडितांच्या नातेवाईंकांना भेटण्यापासून रोखण्यात आलं होत मात्र काल या दोघांनीही मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांची भेट घेतली.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT